आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळाचा फटका मैदानाला नाही, भारत-इंग्लंड पाचवी कसोटी चेन्नईत होणार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारत-इंग्लंड यांच्यातील चेन्नई येथे होणाऱ्या पाचव्या क्रिकेट कसोटीवर संभाव्य पावसाचे आणि सोमवारी आलेल्या वादळाचे सावट आहे. मात्र एम.ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी व मैदानावर वादळाचा कोणताही परिणाम न झाल्यामुळे येत्या १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, असा विश्वास यजमान तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव कासी विश्वनाथन यांनी व्यक्त केला आहे. विश्वनाथन यांनी सांगितले, ‘वादळामुळे स्टेडियमवरच्या लाइट स्क्रीनचे व अन्य भागातील सुविधांचे नुकसान झाले आहे. मात्र, खेळपट्टी व मैदान सुस्थितीत आहे.’

स्टेडियमकडे येणाऱ्या रस्त्यांवरची शेकडो झाडे कोलमडून मध्येच पडली आहेत. येत्या दोन दिवसांत त्या झाडांना दूर हटविणे हे आमच्यापुढचे खरे आव्हान आहे. विश्वनाथन यांनी दोन दिवसांत तो रस्ता पूर्ववत मोकळा करू शकू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...