आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे बॉय डिव्हिलर्सचे वेगळेपण! ८०७४ कसोटीत, तर ८६२१ वनडेत धावा काढल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केपटाऊन - १७ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रिटोरिया येथे जन्मलेला द. आफ्रिकेचा क्रिकेट कर्णधार ए. बी. डिव्हिलर्स जगातल्या अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. बुधवारी डिव्हिलर्सच्या वाढदिवशी टि्वटवर त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला. बर्थडे बॉय डिव्हिलर्सचे हे आहे वेगळेपण.
>कसोटीत ए. बी. डिव्हिलर्स द. आफ्रिकेचा सर्वाधिक धावा काढणारा तिसरा फलंदाज आहे. त्याच्या नावे ८०७४ धावा आहेत. त्याच्यापेक्षा अधिक धावा ग्रॅमी स्मिथ (९२६५) आणि जॅक कॅलिस (१३२८९) यांनी काढल्या आहेत.
>डिव्हिलर्सने वनडेत ८६२१ धावा काढल्या. आफ्रिकेकडून वनडेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनण्यासाठी त्याला आणखी २९५८ धावांची गरज आहे.
>टी-२० क्रिकेटमध्ये डिव्हिलर्सच्या नावे ११६७ धावा आहेत. तो जे. पी. डुमिनीच्या १५२८ धावांपासून केवळ ३६१ ने मागे आहे.
>वनडेत सर्वाधिक वेगवान अर्धशतकाचा विक्रम डिव्हिलर्सच्या नावे आहे. त्याने २०१५ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध जोहान्सबर्ग येथे केवळ १६ चेंडूंत अर्धशतक ठोकले होते.
>२०१५ मध्ये जोहान्सबर्ग वनडेत त्याने केवळ ३१ चेंडंूत शतक ठोकले होते. वनडेत सर्वाधिक वेगवान शतकाचा विक्रम त्याच्या नावे आहे.
>वनडेत डिव्हिलर्सने एका डावात सर्वाधिक १६ षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने जोहान्सबर्ग वनडेत क्रिस गेल आणि रोहित शर्माच्या एका डावातील १६ षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली.
>वर्ल्डकपमध्ये डिव्हिलर्सने गेलच्या बरोबरीने ३७ षटकार मारले आहेत.