टीम इंडियाचा स्टार बल्लेबाज सुरेश रैना सध्या 'हनीमून टूर'वर आहे. रैना पत्नी प्रियंकासोबत फान्समध्ये असून त्याने सोशल साइटवर फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो पत्नी प्रियंका आणि इतर मित्रांसोबत फुटबॉल सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे.
3 एप्रिलला रैना आणि प्रियंका लग्नाच्या बेडीत अडकले. परंतु, रैनाला आयपीएल-8 मुळे हनिमुनला जाता आले नाही. आयपीएल समाप्त होताच रैना आणि प्रियंका हनिमूनसाठी पॅरिसला रवाना झाले. यामुळे बांगलादेश दौर्यापूर्वी कोलकाता येथे आयोजित सरावात रैना सहभागी होऊ शकला नाही.
बांगलादेशचा 7 जूनपासून दौरा
टीम इंडिया 7 जूनला बांगलादेश दौर्यावर जाणार आहे. वनडे टीममध्ये रैनाची निवड झाली आहे. 18 जूनपासून एक दिवसीय मालिका खेळली जाईल. तसेच 10 ते 14 जूनदरम्यान टीम इंडिया एकमात्र कसोटी सामना खेळणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सुरेश रैनाने सोशल साइटवर शेअर केलेले फोटो...