आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकपची फायनल ईडन गार्डनवर रंगणार, मुंबई, नागपूर, बंगळुरू, चेन्नई, मोहाली येथे सामने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुढच्या वर्षी भारतात ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या सामन्यांच्या ठिकाणांची निवड बीसीसीआयने मंगळवारी जाहीर केली. पुरुष व महिलांसाठी होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना ईडन गार्डन, कोलकाता येथे होईल. स्पर्धेचे सामने बंगळुरू, चेन्नई, धरमशाला, मोहाली, मुंबई, नागपूर व नवी दिल्ली येथे होतील.

या सात यजमानांना सामन्यांचे यजमान पद स्वीकारण्याआधी आयसीसी आणि बीसीसीआय यांचे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठीचे नियम, निकष, अटींची पूर्तता करावी लागेल. आयसीसीने निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनाच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या केंद्रांनाच सामने आयोजित करण्याची परवानगी मिळेल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयने स्वतंत्र समिती स्थापन केली असून त्याचे अध्यक्षपद बीसीसीआयचे चेअरमन जगमोहन दालमिया यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर या समितीचे समन्वयक असून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आशिष शेलार यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे. अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी, जी. गंगा राजू, राजीव शुक्ला, ए. बेहरा हे या विश्वचषक स्पर्धा आयोजन कार्यकारी समितीचे अन्य सदस्य आहेत.
बातम्या आणखी आहेत...