आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० विश्वचषक : धर्मशालामध्ये भारताचा पाकिस्तानशी मुकाबला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्वेंटी-२० विश्वचषक ट्रॉफीसोबत क्रिकेटपटू विराट कोहली, अजिंक्य राहणे आणि शिखर धवन. - Divya Marathi
ट्वेंटी-२० विश्वचषक ट्रॉफीसोबत क्रिकेटपटू विराट कोहली, अजिंक्य राहणे आणि शिखर धवन.
मुंबई - बीसीसीआयने पुरुष व महिला ट्वेंटी- २० विश्वचषक क्रिकेटचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. सुमारे ३८ कोटी रुपये बक्षिसांच्या रकमेची ही स्पर्धा ११ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान आठ शहरांत खेळवली जाणार आहे. या विश्वचषकाच्या दोन्ही गटांतील अंतिम सामना ३ एप्रिल रोजी कोलकात्यातील इडन गार्डनवर होणार आहे. आधी महिलांचा आणि त्यानंतर पुरुषांचा सामना होईल. भारत- पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट मालिकेचे भिजत घोंगडे असतानाच ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने भारताच्या भूमीवर भारत- पाकिस्तान दरम्यानचा सामना १९ मार्च रोजी धर्मशालेत होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करताना स्पर्धेचा विस्तृत तपशील दिला.
‘आगामी विश्वचषक स्पर्धेचे भव्य स्वरुपात आयोजन करण्यात येईल. त्यामुळे हा वर्ल्डकप गत स्पर्धेपेक्षा अधिक सरस आणि मनोरंजनात्मक राहील,’असा विश्वास सचिव अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. ही विश्वचषक स्पर्धा अविस्मरणीय करण्यासाठी आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सज्ज झाले आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सध्या कमी वेळेत अधिक आर्थिक कमाई करून देणाऱ्या ट्वेंटी-२० षटकांच्या या क्रिकेट सामन्यांचा विश्वचषकाचे आयोजन ही बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर व अनुराग ठाकूर यांच्या कारकीर्दीत आयोजित होणारी पहिली मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. भारताचे सामनेही मुंबईत आयोजित न करता, नागपूर, मोहाली, बंगळुरू या ठिकाणी आयोजित करून बीसीसीआयने पुन्हा एकदा टीम इंडिया आणि स्थानिक क्रिकेट संघटना यांच्यात खेळपट्टीवरून वाद होऊ नये याचीही काळजी घेतली आहे. त्यामुळे ही स्पर्धा सुरक्षितपणे आयोजित करण्याचा मंडळाचा प्रयत्न असेल.
मुंबई लक्षात ठेवून सामन्यांचे नियोजन : पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट खेळण्यास शिवसेनेचा विरोध पाहता भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा मुकाबला मुंबईत होणार नाही, हे लक्षात ठेवूनच नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण ५८ सामने रंगणार आहेत. यात महिलांच्या २३ आणि पुरुषांच्या ३५ सामन्यांचा समावेश आहे.
शिवसेनेचा धसका, मुंबईत लढत नाही
पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट खेळण्यास शिवसेनेचा विरोध होण्याची शक्यता पाहून दोन्ही देशांदरम्यानचा सामना मुंबईचे घेण्याचे टाळले आहे. सामन्यांचे तसेच नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी, १९ मार्च रोजी हा महामुकाबला धर्मशाला येथे रंगणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, स्‍पर्धेचे वेळापत्रक वेळापत्रक...