आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tambes "offer" That Open Left handed Pair Of Brass

तांबेला "ऑफर' देणाऱ्या हिकेनचे पितळ उघडे !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
मुंबई- बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल, बीसीसीआयने मुंबईचा रणजी क्रिकेटपटू हिकेन शहा याला तत्काळ निलंबित केले आहे. बीसीसीआयची शिस्तपालन समिती यासंदर्भात अंतिम चौकशी करून पुढील आदेश देईपर्यंत हिकेन शहा याचे निलंबन कायम राहील. त्याला बीसीसीआयच्या बीसीसीआयचा सर्व संलग्न संघटनांनी आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धेत पुढील आदेश येईपर्यंत खेळता येणार नाही.
यासंदर्भात हिकेन शहा याची पालक संघटना मुंबई क्रिकेट असोसिएशन संभ्रमात पडली असून, यासंदर्भात एक चौकशी समिती नेमून दोषी क्रिकेटपटू हिकेन शहा याची चौकशी करण्याचे ठरविण्यात येईल, अशी शक्यता आहे.

यासंदर्भात मुंबई क्रिकेटचे कोषाध्यक्ष नितीन दलाल यांनी सांगितले, आम्हाला बीसीसीआयने आजच कळविले आहे. ज्येष्ठ उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर परदेशात आहेत, त्यामुळे ते भारतात आल्यानंतरच निर्णय होईल. शरद पवार (अध्यक्ष) आशिष शेलार (उपाध्यक्ष) हे दोन पदाधिकारी निर्णय घेतील. मात्र क्रिकेट संदर्भातील गोष्टी वेंगसरकर आल्यानंतरच अधिक स्पष्ट होतील.

हिकेन शहा याने आपला रणजी सहकारी प्रविण तांबे याला आयपीएल सामना फिक्स करण्याबाबत ऑफर दिली होती. तांबेने बीसीसीआयच्या अॅन्टी करप्शन युनिटकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण बाहेर आले. मात्र त्या घटनेला कित्येक महिने उलटून गेल्यानंतर आता बीसीसीआयने कारवाई केली आहे. ३० वर्षीय हिकेन शाहने ३७ रणजी सामने खेळले आहेत.
गैरप्रकारांना आळा...
बीसीसीआयअध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी, असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही. अशा गैर प्रकारांना वेळीच आळा बसावा, यासाठी ही कारवाई केल्याचे म्हटले.
आचारसंहिता भंग
हिकेनशहा याच्यावर निलंबनाची कारवाई करताना, बीसीसीआयच्या अॅन्टीकरप्शन युनिटने, बीसीसीआयच्या आचारसंहितेच्या कलम २.१.१, २.१.२ २.१.४चा भंग केल्याचे म्हटले आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून अॅन्टीकरप्शन युनिटने चौकशी अहवाल बीसीसीआय अध्यक्षांना सादर केला.