आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Captain Cool MS Dhoni Birthday Special

PHOTOS: ग्लॅमरस धोनी प्रसिद्धीपूर्वी असा होता अत्यंत साधासुधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत क्रिकेपटू महेंद्रसिंह धोनीचे जीवन कधीकाळी अत्यंत साधेसुधे होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या धोनीने असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर केवळ क्रिकेटर होण्याचे स्वप्नच पूर्ण केले नाही तर, अमाप प्रसिद्धीही मिळवली. आज, धोनी जगातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहे. आज (7 जुलै) तो 34 वर्षांचा झाला.
एमएस धोनीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनातील काही फॅक्ट्सः
धोनीच्या चाहत्यांना त्याच्याबाबत अनेक गोष्टी माहित आहेत. असे असले तरी काही नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असतेच. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने, आम्ही त्याच्या लहानपणापासून ते आजपर्यंतच्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनातील वाटचालीच्या काही निवडक गोष्टी घेऊन आलो आहोत. त्याच बरोबर प्रसिद्धीपूर्वीच्या जीवनावर प्रकाश टाकणारे काही फोटोजदेखील सादर केले आहेत.
- 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध वनडेत पदार्पण करणारा धोनी पहिल्याच बॉलवर धावबाद झाला होता.

- धोनी बॉलीवुड स्टार्स बिपाशा बसू आणि जॉन अब्राहमचा क्लोज फ्रेंड आहे. त्याचे मोठे केस जॉनचीच कॉपी होती. धोनीच्या त्या लुकची स्तुती तर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनीही केली होती.

- धोनीचे बाइक्सविषयी असलेले प्रेम जग-जाहीर आहे. त्याच्याजवळ जुन्या आणि नव्या अशा 23 बाइक्स आहेत.
- आयसीसी प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळविणारा धोनी हा एकमेव क्रिकेटर आहे.

- धोनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि गानकोकिळा लता मंगेशकरांचा चाहता आहे.

- 1999-2000 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी त्याने रणजीमध्ये बिहारच्या टीममध्ये पदार्पण केले.

- शालेय जीवनात धोनीला क्रिकेटपेक्षाही फुटबॉल आणि बॅडमिंटनमध्ये अधिक रस होता.

- क्रिकेट विश्वाच्या बाहेरही धोनी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. बॉलीवुड किंग शाहरुख खान नंतर तोच सर्वाधिक ब्रॅंड्सची जाहिरात करणारा स्टार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा स्टार होण्याआधी कसा दिसायचा धोनी आणि कसं होतं त्याचं लाईफ...