आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी रोबोट नाही, कापून पाहा रक्त निघेल; मला देखील विश्रांतीची गरज - विराट कोहली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट सिरीजचा पहिला सामना गुरुवारी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. श्रीलंका विरुद्ध 3 टेस्टच्या सिरीजमध्ये पहिल्या दोन सामन्यांत हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यावर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना विराट कोहलीने आराम अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर आपण स्वतः देखील वर्षाला 40 सामने खेळतो आहे. त्यामुळे मलाही आराम हवाय असे विराटने सांगितले आहे. 
 
एवढेच नव्हे, तर आपण सलग खेळायला काही रोबोट नाही. कापून पाहिल्यास माझेही रक्तच निघेल असे विराट म्हणाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, विराट कोहलीने गेल्या वर्षभरात विश्रांती न घेता, जेवढे सामने खेळले तेवढे जगातील कुठल्याही क्रिकेटरने खेळलेले नाही. त्याने बीसीसीआयकडे यापूर्वीच सुट्टीचा अर्ज केला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने देखील त्याला सुट्टीची गरज असल्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात विराटने जेव्हा बीसीसीआयकडे सुट्टीचा अर्ज केला. तेव्हा, तो अनुष्कासोबत लग्नासाठी सुट्टी घेत असल्याची चर्चा उडाली. ती चर्चा आजही सुरू आहे. टेस्ट सिरीजनंतर विराटला विश्रांती दिली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...