आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Team India Cricketer Ajinkya Rahane\'s B\'day Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: छुपा रुस्तम निघाला मराठमोळा अजिंक्य रहाणे, बालपणीच्या मैत्रिणीला करायचा डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याचा आज वाढदिवस आहे. 6 जुन 1988 रोजी त्याचा जन्म झाला. अरेंज मॅरेज करणाऱ्या निवडक क्रिकेटर्समध्ये अजिंक्यचा समावेश होतो. लग्नाच्या बाबतीत तोही सुरसे रैना सारखा छुपा रुस्तम निघाला. अजिंक्य आणि पत्नी राधिका बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. लपून छपून दोघे एकमेकांना डेटही करीत होते. पण याची माहिती कुणालाही लागली नव्हती. जवळच्या मित्रांपासूनही त्याने ही बाब लपवून ठेवली होती. राधिकाला क्रिकेट आवडत नाही. पण तरीही अजिंक्यची मॅच असेल तर राधिका स्टेडियममध्ये उपस्थित असते. राधिका माझ्यासाठी लकी असल्याचे अजिंक्य सांगतो. राधिका स्टेडियममध्ये असेल तर जास्त धावा निघतात, असेही तो सांगतो.
राधिका आहे पुण्याची
26 सप्टेंबर 2014 रोजी अजिंक्यचे लग्न झाले. लग्नापूर्वी दोघे मुंबईतील मुलुंड परिसरात राहत होते. दोघांच्या कुटुंबीयांनी परवानगी दिल्यानंतर हे लग्न झाले. राधिका मुळची पुण्याची आहे. लग्न पक्के झाले तेव्हा अजिंक्य इंग्लंड दौऱ्यावर होता.
'बेस्ट फ्रेंड' राधिका
रहाणे आणि धोपावकर कुटुंब अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर अजिंक्यने राधिकाला बेस्ट फ्रेंड म्हटले होते. याबाबत त्याने फेसबुकवर लिहिले होते, की आता मी माझी बेस्ट फ्रेंड आणि प्रेम राधिकासोबत ऑफिशिअली मॅरीड आहे.
पुढील स्लाईडवर बघा, अजिंक्य रहाणेच्या रिसेप्शनला कोण कोणते खेळाडू उपस्थित होते.... सचिनने दिल्या होत्या शुभेच्छा...