आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुरच्या या सेलिब्रिटी क्रिकेटरने शेअर केले लग्नाच्या वाढदिवसाचे रोमॅंटिक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट टीमचा फास्टर उमेश यादव याने 29 मे रोजी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. 29 मे 2013 रोजी उमेशने फॅशन डिझायनर तान्या वाढवासोबत लग्न केले. उमेशने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्याने काही फोटोही शेअर केले आहेत.
आयपीएलच्या वेळी झाली होती भेट
उमेश आणि तान्या यांची पहिली भेट 2012 मध्ये झालेल्या आयपीएलच्या वेळी झाली होती. तेव्हा तान्या फॅशन डिझाईनचा कोर्स करीत होती. पहिल्या भेटीतच उमेश तान्याच्या प्रेमात पडला होता. काही काळाने त्याने तान्याला प्रपोज केले. फॅशन डिझाईनचा कोर्स पूर्ण झाल्यावर दोघांनी लग्न केले. उमेशची मॅच असेल तर तान्या स्टेडियममध्ये दिसते. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये पत्नीला ऑस्ट्रेलियात नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठवल्यावर तान्या ऑस्ट्रेलियात दिसली होती.
पुढील स्लाईडवर बघा, नागपुरच्या या कपलने सोशल मीडियावर असे भन्नाट फोटो शेअर केले आहेत...