आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा आज ठरणार नवा प्रशिक्षक; शास्त्री सर्वात पुढे, सेहवागसह हे आहेत 10 उमेदवार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. सोमवारी १० जुलै रोजी टीम इंडियाचा नवा कोच ठरेल. बीसीसीआयला प्रशिक्षक पदासाठी १० अर्ज मिळाले आहेत. या १० अर्जांची छाननी आणि मुलाखती सोमवारी होतील.
 
बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे तिघे नवा  कोच निवडतील. टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री नव्या कोचच्या शर्यतीत सर्वांत पुढे असल्याचे मानले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.   
 
बीसीसीआयला ज्या १० लोकांचे अर्ज मिळाले त्यामध्ये रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, ऑस्ट्रेलियाचे टॉम मुडी, द. आफ्रिकेचे रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, द. आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू लान्स क्लुजनर, ओमानचे राष्ट्रीय कोच राकेश शर्मा, वेस्ट इंडीजचे फिल सिमन्स आणि उपेंद्रनाथ ब्रम्हचारी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील शास्त्री, मुडी, सेहवाग, सिमन्स, पायबस आणि राजपूत या सहा जणांच्या मुलाखती होतील. क्लुजनरला राखीव ठेवण्यात आले आहे. जो नवा कोच बनेल, बीसीसीआय त्याला दोन वर्षांचा करार देईल. हा व्यक्ती २०१९ च्या विश्वचषकापर्यंत टीम इंडियाचा कोच असेल.  
 
शास्त्री आहेत प्रबळ दावेदार 
-  शास्त्री यांनी आधी कोचसाठी अर्ज केला नव्हता. बीसीसीआयने अर्ज करण्याची मुदत ९ जुलै केल्यानंतर शास्त्री यांनी सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरून अर्ज केला. शास्त्रीच कोचच्या शर्यतीत सर्वांत पुढे आहेत.  
- शास्त्री आधी सुद्धा टीम इंडियाचे डायरेक्टर होते. कोहली- शास्त्रीचे संबंध चांगले आहेत. यामुळे शास्त्री पहिली पसंत ठरू शकतात.  
- मागच्या वेळी सुद्धा शास्त्री यांनी अर्ज केला होता. मात्र, सौरव गांगुलीसोबत मतभेद झाल्यानंतर कुंबळेला कोच बनवण्यात आले.   
 
हेही आहे शर्यतीत : लान्स क्लुजनर आक्रमक फलंदाज आणि चांगला गोलंदाज होता. द. आफ्रिकेत स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देतो. सिमन्सने अफगाणिस्तान आणि आयर्लंडसारख्या संघांना प्रशिक्षण दिले आहे. लालचंद राजपूत यांच्याकडेही प्रशिक्षणाचा अनुभव आहे. राजपूत यांची दावेदारी कमी लेखली जाऊ शकत नाही.
 
टॉम मुडी सक्षम दावेदार 
- शास्त्री यांच्या स्पर्धेत टॉम मुडी हे प्रबळ दावेदार आहेत. मुडी यांनी श्रीलंकेला २०११ मध्ये वर्ल्डकप फायनलपर्यंत पोहोचवले होते. त्यांच्या मार्गदर्शनात सनरायझर्स हैदराबादने आयपीएल जिंकले होते. त्यांनी मागच्या वेळी सुद्धा अर्ज केला होता.   
- मुडी स्वभावाने शांत आणि पडद्यामागे राहून चाणाक्षपणे काम करणारे व्यक्ती मानले जाते. ते कोच  बनले तर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू क्रेग मॅक्डरमॅटला गोलंदाजी कोचची जबाबदारी मिळू शकते.
 
शास्त्री यांची उजवी बाजू 
कोहलीचे समर्थन : आधी टीम डायरेक्टर असलेल्या शास्त्री यांचे कर्णधार कोहलीसोबत चांगले संबंध आहेत.
कार्यकाळ शानदार : शास्त्रींच्या काळात भारताने इंग्लंडमध्ये २०१४ मध्ये मालिका जिंकली. २०१५ वनडे आणि २०१६ टी-२० विश्वचषकाच्या सेमीत टीम इंडियाचा प्रवेश.
मॅन मॅनेंजमेंट स्किल : मॅन मॅनेजमेंट स्किलसाठी शास्त्री यांना ओळखले जाते. शास्त्री नेहमी खेळाडूंचा मनोबल वाढवण्यावर जोर देतात. माजी कर्णधार गावसकर सुद्धा शास्त्री यांच्या या गुणाची स्तुती करतात.
 
सेहवागकडे खास अनुभव नाही 
वीरेंद्र सेहवाग आक्रमक सलामीवीर असला तरीही प्रशिक्षणाचा त्याच्याकडे अनुभव नाही. आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटर आहे. मात्र, पंजाबचे प्रदर्शन साधारण होते.
बातम्या आणखी आहेत...