नवी दिल्ली - येत्या ८ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत यजमान भारतीय संघ वेस्ट इंडीज आणि द. आफ्रिका यांच्याविरुद्ध अनुक्रमे १० आणि १२ मार्च रोजी सराव सामने खेळतील. वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना कोलकाता ईडन गार्डन येथे तर द. आफ्रिकेचा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होईल.
वर्ल्डकपमध्ये सहभागी होणारे संघ पहिल्या फेरीत ३ ते ६ मार्च या काळात धर्मशाला, मोहालीत सराव सामने खेळतील. दुसऱ्या फेरीत काेलकाता आणि मुंबईत सराव लढती होतील. पुरुषांचे सामने दुपारी ३ आणि सायंकाळी ७ वाजता सुरू हाेतील. महिला संघाचे सामनेही या काळात होतील.