आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी-कोहलीतच नव्हे संघातही मतभेद, प्रशिक्षकाबाबतही टीम इंडियात फूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बांगलादेशकडून वन डे मालिकेत मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडियासमोर अंतर्गत मतभेद कमी करण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. प्रशिक्षकाच्या नेमणुकीपासून अनेक मुद्यांवर टीममधील सदस्यांमध्ये मतभेद आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कसोटी कर्णधार विराट कोहली प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रींची वकिली करत आहे. तर धोनी अजूनही माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचरच्या काळात संघावर पडलेल्या सकारात्मक प्रभावाची चर्चा करत आहे. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाबाबत टीममध्ये मतभेद असल्याचे चित्र आहे.

इतरही अनेक कारणे
उपकर्णधार कोहलीने सार्वजनिकरित्या कर्णधार धोनीच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर रैना आणि अश्विनसारख्या खेळाडुंनी धोनीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्णधाराबाबतही टीममधील सदस्यांचे एकमत नसल्याचे समोर येत आहे. त्यात संघनिवड करताना खेळाडुंची निवड त्यांनी अचानक डच्चू दिल्याच्या प्रकारांमुळेदेखिल संघातील सदस्यांमध्ये राग आहे. काही खेळाडू धोनीकडून सार्वजिनकरित्या केल्या जाणाऱ्या टीकेमुळेही नाराज आहेत. त्याशिवाय संभाव्य प्रशिक्षक रवी शास्त्रीबाबत धोनीच्या उदासीनतेचीही चर्चा आहे.

राहणे, यादववर धोनीने चढवला होता हल्ला
एका इंग्रजी वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार काही खेळाडुंना सातत्याने खराब कामगिरी केल्यानंतर टीममध्ये संधी तर काहींना पुरेशी संधी मिळत नसल्यामुळे काही सदस्य नाराज आहेत. सर्वांना समान संधी मिळाव्यात अशी संघातील सदस्यांची इच्छा आहे. धोनीने अजिंक्य राहणेला संघातून वगळण्याची सार्वजनिकरित्या चर्चा केली होती. तज्ज्ञांनीही हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले आहे. धोनी म्हणाला होता, राहणे वेगवान खेळपट्ट्यांवर अधिक चांगला खेळतो. संथ खेळपट्ट्यांवर मात्र सुरुवातीला त्याला स्ट्राइक रोटेट करणे अवघड जाते. त्यामुळे अजिंक्यने काही काळ वाट पाहावी, असे तो म्हणाला.

धोनीने बांगलादेशच्या विरोधात अखेरच्या वन डे नंतर वेगवान गोलंदाजांवरही हल्ला चढवला होता. धोनी म्हणाला होता, ''आपल्याला वेगवान गोलंदाज हवे आहेत की, वेग कमी असला तरी योग्य टप्प्यावर चेंडू टाकणारे गोलंदाज हवे आहेत, याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते धोनीचा इशारा उमेश यादवकडे होता. तो मालिकेत बराच महागडा ठरला. टीम डायरेक्टर रवी शास्त्री आणि कोहली, दोघेही वेगवान गोलंदाजांना पाठिंबा देत आहेत. वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीने धोनी सध्या निराश आहे.

धोनीची वागणूक चुकीची?
बांगलादेशच्या विरोधात तिसरा वन डे सामना संपताच धोनीने वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला होता. त्याआधी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ट्विट केले होते. मैदानावर गोलंदाजीपेक्षा कर्णधाराकडून वेगवान गोलंदाजांचा कसा वापर केला जातो याची अधिक चिंता असल्याचे त्याने ट्विटमध्ये म्हटले होते. एका माजी क्रिकेटपटूनेही धोनीकडून नेहमी वेगवान गोलंदाजांचा संशयास्पद वापर केला जात असल्याचे म्हटले आहे. धोनीच्या नेतृत्वात 18 ते 19 वेगवान गोलंदाज खेळले आहेत. पण कोणीही संघात टिकू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...