आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाने बांगलादेशी अंपायर्सच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयकडे नोंदवली तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री - Divya Marathi
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री
नवी दिल्ली- टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत अंपायर्सनी दिेलेल्या चुकीच्या निर्णयांसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तक्रार नोंदवली आहे. टीम इंडियाने नुकताच बांगलादेशाचा दौरा केला होता. या दौर्‍यांत टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती.

एका अहवालानुसार, बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत अंपायर्सनी अनेक चुकीचे निर्णय दिल्याचे टीम इंडियाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली असून लवकरच आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) अंपायर्सविरोधात तक्रार करण्‍यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बांगलादेश दौर्‍यात टीम इंडियाला वनडे मालिकेत 2-1 असा पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, टीम इंडियाने या पराभवाचे खापर अंपायर्सच्या डोक्यावर फोडले आहे.

या निर्णयावर टीम इंडियाने घेतली हरकत...
मुस्तफिजुरविरुद्धची तक्रार गांर्भीयाने घेतली नाही...

दुसर्‍या वनडे सामन्यादरम्यान बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रेहमानविरुद्ध टीम इंडियाने अंपायरकडे तक्रार केली होती. मुस्तफिजूर हा वारंवार भारतीय फलंदाजाच्या मार्गात आडवा येत होता. त्यामुळे भारतीय फलंदाजाना धावा घेताना अडचणी येत होत्या. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार धोनी धाव घेताना मुस्तफिजूरला धडकला होता. यामुळे मुस्तफिजूरला दुखापत झाली होती. याप्रकरणी फील्ड अंपायर्सने धोनीवर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, नंतर धोनीने मुस्तफिजूरविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याकडून दंड वसूल करण्यात अाला होता.

कोहलीने झेल घेतल्यानंतरही दिले नॉट आउट!
दुसर्‍या सामन्यात विराट कोहलीने तमीम इकबालचा झेल घेतल्याचा दावा केला होता. परंतु, अंपायर अनीसुर रेहमानने कोहलीचे अपील फेटाळून इकबालला नॉट आउट घोषित केले होते. विराटने झेल घेतला तेव्हा चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याचे अनीसुर रेहमानने म्हटले होते.

अंबाती रायुडुच्या पॅडला लागला होता चेंडू परंतु दिले आऊट!
तिसर्‍या वनडे सामन्यात अंबाती रायुडूला अंपायर इनामुल हकने विनाकारण आऊट दिले होते. मात्र, रायुडु नॉट आऊट असल्याचे टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्‍ट दिसत होते. चेंडू पॅडला लागला होता. येथे अंबातीने अंपायरच्या निर्णयावर हरकत घेतली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक पाहा, संबंधित फोटो...