आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिल कुंबळेने बदलला टीम इंडियाचा माहौल; ड्रम वाजवताना दिसले कर्णधार धोनी - विराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - वेस्ट इंडीज दौऱ्यावरपूर्वी भारतीय क्रिकेट खेळाडूंनी रविवारी एका संगीत कार्यक्रमाचा आनंद घेतला. यात कर्णधार एम. एस. धोनी आणि विराट कोहली ड्रम वाजवताना दिसले. मुख्‍य कोच अनिल कुंबळे याने खेळाडूंमध्‍ये खेळीमेळीचे वातावरण तयार केल्‍याचे यातून स्‍पष्‍ट झाले. यावेळी ज्‍युनियर टीमचा कोच राहुल द्रविडसुद्धा उपस्‍थ‍ित होता. दरम्‍यान, टीमच्‍या फ्यूचर रोड मॅप अनुषंगाने एक बैठकसुद्धा झाली.
संगीत कार्यक्रमात खेळाडूंनी काय केले...
> बीसीसीआयने ‘टीम बॉन्डिंग’ सेशनचे फोटो ट्विटरवर शेअर किले
> यात धोनी आणि कोहलीसोबत इतर प्लेयर्स आणि सपोर्टिंग स्टाफ ड्रम वाजवताना दिसले. प्रशिक्षिण शिबिरात खेळाडूंसाठी पहिल्‍यांदाच अशा प्रकारच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले.
टीम इंडियाच्‍या रोड मॅपवर मीटिंग
> भारतीय संघाचा रोड मॅप तयार करण्‍यासाठी दोन्‍ही कर्णधार कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची अनिल कुंबळे आणि राहुल द्रविडसोबत दीर्घ मीटिंग झाली.
> मीटिंगला नॅशनल सिलेक्टर संदीप पाटील, एम. व्‍ही. श्रीधर, एनसीएचा फलंदाज कोच डब्ल्यू. व्‍ही. रमन आणि स्पिन बॉलिंग कोच नरेंद्र हिरवानीसह फिजियो एंड्रयू लीपस उपस्‍थ‍ित होते.

असे आहे कुंबळेचे धोरण
कुंबळेच्‍या नव्‍या धोरणानुसार, फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजाला फलंदाजी सुधारण्याबाबत महत्त्वाच्या ‘टिप्स’ देईल. दुसरीकडे, एखादा फलंदाज त्याच्या सहकारी गोलंदाजाकडून ‘पार्टटाईम’ गोलंदाजी शिकण्याचा प्रयत्न करेल. भारतीय क्रिकेट संघाचे सध्या बंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव शिबिर सुरू आहे. शक्यता सराव म्हणजे फलंदाजांना नेटमध्ये सराव दिला जातो. त्यांना गोलंदाज बॉलिंग करतात. फलंदाजी आणि गोलंदाजीनंतर क्षेत्ररक्षण सुधारण्याहेतूने झेल घेण्याचा सराव केला जातो. मात्र भारताच्या सराव शिबिरात कर्णधार विराट कोहली मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मध्यमगती गोलंदाजी टाकताना दिसला. आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा हा लेगस्पिनर अमित मिश्राला गोलंदाजी सुधारण्याबाबत ‘टिप्स’ दिल्या. फटकेबाज सलामीवीर रोहित शर्माने अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीसोबत वेळ घालवला. नेमके काय चालले आहे, असा सर्वाना प्रश्न पडला. त्याची उकल पुजाराने केली. ‘‘आमच्या जोड्या बनवण्यात आल्या. प्रत्येक जोडीत एक फलंदाज आणि एक गोलंदाज होता. फलंदाजाने गोलंदाजांना आणि गोलंदाजाने फलंदाजाला मदत करायची असे सांगण्यात आल्याचे,’’ पुजाराने सांगितले.
चेतेश्वर पुजाराने अमित मिश्राच्या ‘फिरकी’वर काही वेळ फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर मिश्राने पॅड बांधले आणि पुजाराने लेगस्पिन करून त्याला चार-पाच षटके गोलंदाजी टाकली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, वेस्‍टइंडीज दौऱ्यासाठीचा संघ...