आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मित्राला भेटला जहीर, म्हणाला- आम्ही दोघे दीड-दीड रुपयांत बघायतो चित्रपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- टीम इंडियाचा गोलंदाज जहीर खान याचे स्वरनसिंग कल्सी हॉस्टेल रुममेट होते. त्यांनी चेन्नईत क्रिकेट प्रशिक्षणादरम्यान जहीरची भेट घेतली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या. सध्या जहीर टीम इंडियात आहे तर कल्सी भारतीय रेल्वेत चीफ ऑफिस सुप्रिटेडंट आणि स्पोट्स सेक्रेटरी आहेत.
1999 ते 2000 मध्ये दोघांनी चेन्नईत ऑस्ट्रेलियाचा फास्टर डेनिन लिली याच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेतली होती. यावेळी टेस्ट प्लेअर हरविंदरसिंग आणि टीम इंडियातील इतर खेळाडूही त्यांच्यासोबत होते. यावेळी शनिवारी रात्री जहीर खान, कल्सी आणि इतर खेळाडू दीड दीड रुपये जमा करायचे. वीस रुपये जमले की हॉलिवूडच्या चित्रपटाची कॅसेट आणायचे. इंन्स्टिट्यूटच्या व्हीसीआरवर चित्रपट बघायचे. रविवारी उशीरापर्यंत झोपायचे. गर्मी असेल तर रात्री सुमारे तीन वाजता फिरायला बाहेर पडायचे.
सचिनच्या ऑटोग्राफसाठी जहीरने बघितली होती वाट
कल्सी सांगतात, की अॅकॅडमीत सचिन तेंडलकर येणार होते. त्यावेळी सचिन टीम इंडियाचे कर्णधार होते. यावेळी माझ्या पायाला दुखापत झाली होती तर जहीरच्या हाताला सुज होती. तरीही आम्ही त्यांच्यासाठी बॉलिंग केली. सचिन जेव्हा परत जात होते तेव्हा बॅटवर त्यांची सही घेतली. यासाठी आम्हाला बराच वेळा वाट बघावी लागली.
युवराज देत नाही रिस्पॉन्स
कल्सी सांगतात, की जहीर खान अजूनही तेवढाच साधा आहे. आजही आम्ही अनेक तास बोलतो. संधी मिळाली तर भेटतो. युवराजसिंग याच्यासोबतही मी क्रिकेट खेळलो आहे. पण युवराज आधी सारखा रिस्पॉन्स नाही देत.
पुढील स्लाईडवर बघा, स्वरनसिंग कल्सी यांच्यासोबत जहीर खान... आणि दोघांचा जुना फोटो...