आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-AUS वनडे सिरीजसाठी टीमची घोषणा, मोहम्मद शमीसह उमेश यादव परतला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल) - Divya Marathi
(फाइल)
स्पोर्ट्स डेस्क - बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे सिरीजमध्ये सुरुवातीच्या 3 मॅचसाठी आज टीमची घोषणा केली. एकूण 5 सामन्यांच्या वनडे सिरीजची पहिला मॅच 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. तर फायनलची लढत 1 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. यानंतर तीन टी-20 सामने सुद्धा खेळले जाणार आहेत. 
 
 
उमेश, शमीचे पुनरागमन
- निवड समितीचे चेअरमन एमएसके प्रसाद सध्या लखनऊत आहे. ते कॉन्फ्रेंस कॉलच्या माध्यमातून समितीच्या बैठकीशी जोडले गेले. तर, सरनदीप आणि देवांग गांधी दिल्ली आणि कोलकात्यात आहेत.- या सिरीजसाठी उमेश यादव आणि मो. शमी टीममध्ये परतले आहेत. श्रीलंकेच्या विरोधात वनडे सिरीज दरम्यान त्यांना विश्रांती देण्यात आली होती. 
- आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा पुन्हा एकदा टीममधून बाहेर आहेत. जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. तर, आर. अश्विन इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. तेथे त्याने 4 सामन्यांचा करार केला आहे. त्यापैकी केवळ दोनच मॅच झाले आहेत. अशात तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये सहभागी होणार नाही.
- श्रीलंका दौऱ्यावर धडाकेबाज परफॉर्म करणारे मनीष पांडेय, केदार जाधव, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहेत. 
- विराट कोहली यावेळी सुद्धा टीमला लीड करणार आहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा... संपूर्ण सिरीजचे वेळापत्रक...
बातम्या आणखी आहेत...