आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AUS विरुद्ध टी-20 साठी टीमची घोषणा, नेहराचे पुनरागमन; जडेजा, अश्विनला विश्रांती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - वनडे मालिका विजयाचे मिशन पूर्ण करणारा यजमान भारतीय संघ अाता टी-२० सिरीज जिंकून दिवाळीपूर्वी धमाका उडवण्याच्या तयारीत अाहे. यासाठी विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू सज्ज अाहेत. येत्या ७ अाॅक्टाेबरपासून रांचीमध्ये भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात हाेणार अाहे.  या मालिकेसाठी साेमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने १५ सदस्यीय टीम इंडियाची घाेषणा केली.  संघात ३८ वर्षीय वेगवान गाेलंदाज अाशिष नेहरा अाणि यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला दमदार कमबॅक करण्याची संधी मिळाली अाहे. दुसरीकडे निवड समितीने पुन्हा एकदा रवींद्र जडेजा अाणि अार. अश्विनच्या कमबॅकच्या अाशेवर पाणी फेरले. या दाेघांची या मालिकेसाठी संघात निवड करण्यात अाली नाही. त्यांना विश्रांती देण्यात अाली.   

येत्या शनिवारपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. धाेनीच्या हाेम ग्राउंडवर रांचीमध्ये सलामीचा सामना रंगणार अाहे. यजमान भारत अाणि अाॅस्ट्रेलियन टीम तीन दिवसांच्या फरकाने टी-२० मालिकेतील सामने खेळणार अाहे.  यामध्ये ७ अाॅक्टाेबरला रांचीत पहिला सामना, १० अाॅक्टाेबरला गुवाहाटीत दुसरा सामना अाणि १३ अाॅक्टाेबर राेजी हैदराबादमध्ये शेवटचा तिसरा सामना रंगणार अाहे.   

निवड समितीने संघ जाहीर करताना ३८ वर्षीय अाशिष नेहराला संधी देणारा निर्णय हा सर्वांसाठी धक्कादायक ठरला. त्याने अापला शेवटचा टी-२० सामना फेब्रुवारीत खेळला हाेता. यादरम्यान त्याने इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले हाेते. यातून त्याला अाठ महिन्यांनंतर पुनरागमन करण्याची संधी देण्यात अाली. त्यानंतर मात्र त्याला विंडीज व श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी पुन्हा  संघात स्थान मिळवता अाले नाही.
 
 
पुढील स्लाइड्सवर, निवड झालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची यादी...
बातम्या आणखी आहेत...