आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Star Maria Sharapova More Than Richest Athletes From Cricketer Virat Kohli

सौंदर्यातच नव्हे तर कमाईतही नंबर वन आहे ही टेनिसस्टार, कोहलीही आहे मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली हा भारतीय जाहिरातीच्या जगातील एक विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी तर तो आगामी काळात सचिन आणि धोनीलाही मागे टाकेल असे भाकित केले आहे. पण जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडुंच्या यादीवर नजर टाकली तर कोहली त्यांच्या बराच मागे असल्याचे लक्षात येते. टॉप-10 पैकी 8 महिला खेळाडू या कोहलीपेक्षा अधिक कमावतात. सध्या कोहलीची एकूण संपत्ती सुमारे 120 कोटी रुपये आहे. तर फोर्ब्सनुसार 2014 मध्ये विराटची वार्षिक कमाई 7.1 मिलियन डॉलर (सुमारे 46 कोटी) होती. दुसरीकडे जगातील सर्वात सुंदर टेनिसस्टार म्हणून ओळख असलेल्या मारिया शारापोव्हाची वार्षिक कमाई 173 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कमाईच्या बाबतील ती पहिल्या क्रमंकावर आहे.

बांग्लादेश विरुद्ध कसोटी आजपासून
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया आज (10 जून) पासून बांग्लादेशच्या विरोधात कसोटी खेळणार आहे. त्यानंतर विराट तीन वन डे मध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळणार आहे. या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला विराट कोहलीच्या तुलनेत अधिक कमाई करणाऱ्या महिला टेनिसपटुंबाबत माहिती देत आहे.

आगामी काळ विराटचाच
ब्रिटनच्या स्पोर्ट्स प्रो नावाच्या स्पोर्ट्स-बिझनेस मॅगझिनने नुकतीच वर्तमान आणि आगामी तीन वर्षांतील बाजारातील शक्यतांच्या अंदाजावरून एक यादी जाहीर केली होती. त्यात विराटला यूसेन बोल्ट, नोवाक जोकोविक, क्रिस्टयानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी यांच्या वर स्थान देण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 10 टेनिसस्टारबाबत...