आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मर्यादित षटकांची 3 वर्षांची लीग शक्य; कसोटी प्रणालीला पर्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- श्रीलंका आणि भारताच्या प्रखर विरोधामुळे द्विस्तरीय कसोटी यंत्रणेचा प्रस्ताव बारगळला असला तरीही येत्या ऑक्टोबरमध्ये आयसीसीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत, त्याला पर्याय ठरू शकणारी, कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय ट्वेंटी-२० लीगची कल्पना साकारली जाऊ शकते.

सदर देशांमधील क्रिकेट वृद्धिंगत व्हावे यासाठी नवनव्या उपाययोजना पुढे येत आहेत. त्यापैकीच ही एक असेल. ‘एफटीपी’ म्हणजे दौऱ्याचा कार्यक्रम बदलता त्या कालावधीतील दोन उच्च स्थानांवर असणाऱ्या देशांची अंतिम लढत, प्रत्येक दोन वर्षांनंतर त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. २०१९ च्या पुढील कार्यक्रमपत्रिकेत त्याचा समावेश करण्यात येईल.
२०२३च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रतेसाठी एकदिवसीय क्रिकेट लीगचा कार्यक्रम तयार करण्यात येईल. १३ देशांमध्ये वर्षांत ही लीग खेळली जाईल. या वर्षांच्या कालावधीत या १३ देशांनी एकमेकांशी किमान एकदिवसीय (५० षटकांचे सामने) मालिका खेळणे आवश्यक आहे. लीगच्या तिसऱ्या वर्षी थेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या संघांसाठी बाद फेरीची स्पर्धा होईल. याच धर्तीवर ट्वेंटी-२० क्रिकेट लीगही आयोजित करण्यात येईल. मालिका प्रत्येकी ३-३ सामन्यांच्याच असतील.

बीसीसीआयचादावा चुकीचा - मनोहर
इंग्लंडमधीलचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तिप्पट बजेट देण्यात आल्याचा बीसीसीआयचा दावा चुकीचा असल्याचे प्रतिपादन आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी केले आहे. वर्ल्ड ‘टी-२०’ २०१६ चे बजेट होते कोटी ५० लाख ८४ हजार डॉलर. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचे बजेट आहे, कोटी ६७ लाख ८१ हजार ५०० डॉलर, असे ते म्हणाले. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कमी, ठिकाणे कमी आणि संघ कमी असले तरीही भारताच्या तुलनेत इंग्लंडमधील राहण्याची खाण्याची व्यवस्था महागडी आहे. त्यामुळे सामन्यांच्या संख्येच्या तुलनेत बजेट वाढले असेल; मात्र प्रत्यक्षात खर्चाचा आकडा कमीच आहे, असेही यावेळी मनेाहर म्हणाले.
मनोहर यांनी या वेळी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली, ते म्हणाले, मी आता आयसीसीचा स्वतंत्र अध्यक्ष आहे. बीसीसीआयचे हित आणि बाजू मांडण्याची जबाबदारी बीसीसीआयचे आयसीसीवर प्रतिनिधित्व करणाऱ्यांची आहे.
बातम्या आणखी आहेत...