आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानींना उचलून हग करणारी ही व्यक्ती कोण? येथे जाणून घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निखिल यांनी नीता अंबानींसमवेत या अंदाजात मुंबई इंडियन्सच्या विजयाचा जल्लोष केला. - Divya Marathi
निखिल यांनी नीता अंबानींसमवेत या अंदाजात मुंबई इंडियन्सच्या विजयाचा जल्लोष केला.
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनल्यानंतर टीम ओनर नीता अंबानींनी खेळाडू आणि टीम स्टाफसोबत विजयाचा जल्लोष केला होता. याच दरम्यान त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक व्यक्ती नीता अंबानी यांना हवेत उचलून हग करताना दिसून आली. ते मुकेश अंबानींचे चुलत भाऊ आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक निखील मेसवानी आहेत. 
 
रिलायन्समध्ये पार पाडली मोठी जबाबदारी
रिलांयन्सच्या वेबसाईटनुसार, मेसवानी यांनी 1986 मध्ये रिलांयन्स ग्रुप ज्वाईन केला. सुरुवातीला ते पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्रीशी जोडले गेले. सोबत त्यांनी ग्रुपच्या कॉर्पोरेट अफेयर्सपासून ते टॅक्सेशन पॉलिसीमध्ये मोठी भूमिका पार पाडली. नंतर ते सिंथेटिक फायबर इंडस्ट्रीचे प्रेसीडेंट आणि एशियन केमिकल फायबर इंडस्ट्री फेडरेशनचे सर्वात तरूण चेयरमन सुद्धा बनले.

IPL मध्ये आहे इंटरेस्ट-
- ही काही पहिलीच वेळ नव्हती जेव्हा निखिल आयपीएलमध्ये आपल्या टीमला चीयर करत होते.
- यापूर्वीही अनेक सीजनमध्ये ते नीता- मुकेश अंबानींची मुले आकाश आणि अनंतसोबत दिसले आहेत.
- याशिवाय ते पूर्वी होत असलेल्या IPL पार्टीतही दिसून यायचे.

14.42 कोटी रुपये सॅलरी
- रिलांयन्स ग्रुपचे एक्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून त्यांना वार्षिक 14.42 कोटी रुपये सॅलरी मिळते. 
- गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रिलांयन्स ग्रुपचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी त्यांची सॅलरी 12 कोटीवरून 14.42 कोटी रूपये इतकी केली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज आणि माहिती...
बातम्या आणखी आहेत...