आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सचिन, धोनीसह कोहलीसारख्या स्टार क्रिकेटर्सचे पहिले 'गुरू'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीचे कोच केशव राजन बॅनर्जी... - Divya Marathi
धोनीचे कोच केशव राजन बॅनर्जी...
स्पोर्ट्स डेस्क - धोनीपासून विराटपर्यंत स्टार बनलेल्या भारतीय क्रिकेटपटूंच्या लाइफमध्ये त्यांचे शिक्षक त्यांचे पहिले कोच होते. याच गुरूंनी घडवलेले स्टार केवळ भारतातच नाही, तर जगभरात चमकत आहेत. नुकतेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या लहानपणीचे कोच रमाकांत आचरेकर यांच्या विषयी सन्मान व्यक्त केला होता. आचरेकर गुरुजींनी आपले आयुष्य कसे बदलले याचे वर्णन करताना त्याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर अपलोड केला होता. शिक्षक दिनानिमित्त अशाच स्टार क्रिकेटर्सचे पहिले कोच असलेल्या त्यांच्या शिक्षकांबद्दल आम्ही आपल्यासाठी संक्षिप्त माहिती घेऊन आलो आहोत.
 
 
शाळेतील कोच व धोनीची स्पोर्ट्स जर्नी
1987 मध्ये जवाहर विद्या मंदिर स्कूलमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून केशव राजन बॅनर्जी रुजू झाले. धोनी केशव बनर्जी यांना आपला पहिला गुरू मानतो. ते 6 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलांना फुटबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. प्रामुख्याने ते फुटबॉलची कोचिंग देत होते. याच ठिकाणी अॅडमिशन घेणाऱ्या धोनीच्या क्रीडा कारकिर्दीची सुरुवात येथूनच झाली.
 

5-6 तास करत होते प्रॅक्टिस
धोनी लहानपणापासूनच मजबूत शारीरिक बांधा आणि चपळ असल्याने राजन सरांचा आवडता विद्यार्थी होता. केशव राजन यांनी धोनीला फुटबालमध्ये गोलकीपरची भूमिका दिली होती. यासाठी अतिशय चपळ माणूस हवा असतो. चांगली शरीरयष्टी असलेला धोनी त्यावेळी सुद्धा 5-6 तास प्रक्टिस करत होता. 
 

बॅडमिंटन आणि फुटबॉल पहिली पसंत
केशव राजन यांनी सांगितल्याप्रमाणे, धोनीची पहिली पसंत क्रिकेट नसून फुटबॉल आणि बॅडमिंटन आहे. तो बालपणी हेच दोन खेळ जास्त खेळत होता. तरीही धोनीने आपल्या करिअरसाठी क्रिकेटची निवड केली. यानंतर धोनीला चंचल भट्टाचार्य यांनी कोचिंग दिली.
बातम्या आणखी आहेत...