आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • They Wanted Me To Cook Chapatis, Stay Indoors: Imran Khan\'s Ex Wife

इम्रान यांच्‍या घरात माझ्यावर केवळ कुत्राच प्रेम करत होता, रेहाम यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू व पाकिस्तान तेहरिक-ए-इंसाफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांचा रेहम खान यांच्यासोबत विवाह झाला होता. मात्र, अवघ्या दहा महिन्यातच दोघांचा घटस्फोट झाला. दरम्‍यान, हे नाते तुटायला पूर्णपणे इम्रान हेच जबाबदार असल्‍याचा गौप्‍यस्‍फोट रेहम यांनी केला. त्‍या म्‍हणाल्‍या, ''मी स्‍वयंपाक खोलीतच आयुष्‍य काढावे आणि त्‍यांच्‍यासाठी भाकरी कराव्‍यात, ही त्‍यांची इच्‍छा होती. मी बाहेर पडलेले त्‍यांना आवडत नव्‍हते,'' असे त्‍यांनी म्‍हटले. घरातील पाळीव कुत्र्याला लाथ मारून बाहेर हाकलून देत असल्‍याच्‍या या आपल्‍यावरील आरोपांचेही त्‍यांनी खंडण करताना त्‍या म्‍हणाल्‍या, ''केवळ कुत्राच असा होता की, तो त्‍यांच्‍यावर प्रेम करत होता.''
इम्रान यांचे दुसरे लग्‍न, दुसरा घटस्‍फोट
इम्रान व रेहम यांनी जानेवारी महिन्यात विवाह केला होता. रेहमान खान यापूर्वी ‘बीबीसी‘मध्ये काम करत होत्या. काही दिवसांतच दोघांमध्ये भांडणे सुरू झाली होती. रेहम या राजकारणात येऊ इच्छित होत्या. मात्र, इम्रान यांचा विरोध होता. यामुळे दोघांनी 30 सप्‍टेंबरला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, इम्रान यांचा यापूर्वी जेमिमा गोल्डस्मिथ बरोबर पहिला विवाह झाला होता. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.
रेहाम यांनी अजून काय म्‍हटले ?
> 42 वर्षीय रेहाम यांनी 'संडे टाइम्स' या वृत्‍तपत्राला सांगितले की, ते लोक स्‍वयंपाक‍ खोलीच्‍या बाहेर पाहू इच्छित नव्‍हते.
> पेशावरमध्‍ये रेहाम जेव्‍हा स्ट्रीट चिल्ड्रेनची अँबेसडर बनल्‍या तेव्‍हा इम्रान खान यांना ही बाब खटकली. हे सांगताना त्‍या म्‍हणाल्‍या, ''यामुळे इम्रान यांना असुरक्षित वाटू लागले. ''

केवळ राजकाणावर गप्‍पा करत इम्रान
रेहाम म्‍हणाल्‍या,''मी त्‍यांच्‍याशी (इम्रान खान) बोलायला जात होती. मात्र, त्‍यांना केवळ राजकारणावरच गप्‍पा करायला रस होता. त्‍यांच्‍यासोबत बॉलीवूड, रंग, आवड, निवड या विषयी बोलण्‍याचा मी प्रयत्‍न करत होते. मात्र, त्‍यांचा प्रतिसादच मिळत नसे''.
रेहाम आता काय करणार ?
> दोन चित्रपटांची निर्मिती करण्‍याचा त्‍यांचा मानस असून, स्ट्रीट चिल्ड्रेनच्‍या संदर्भातील काम त्‍या पुढे सुरूच ठेवणार आहेत.
रेहाम यांच्‍यावर विष देण्‍याचा आरोप
रेहाम या इम्रान यांच्‍या संपत्‍तीवर डोळा ठेवून होत्‍या. त्‍यामुळे त्‍यांना मारण्‍यासाठी त्‍यांनी लाडूमधून स्लो प्वॉइजन देण्‍याचे नियोजन केले होते, असा दावा पाकिस्‍तानातील एका ज्‍येष्‍ठ पत्रकाराने केला.
एसएमएसने दिला होता घटस्‍फोट
तहरीक-ए-इंसाफ पार्टीचे नेता इम्रान यांनी आपली दुसरी पत्नी रेहाम यांना एसएमएसच्‍या माध्‍यमातून घटस्‍फोट दिला, असा दावा ब्रिटिश न्यूज पेपर ‘डेली मेल’ने केला. त्‍यांच्‍या वृत्‍तानुसार, बर्मिंघम एयरपोर्टवर फ्लाइटमधून उतरण्‍याच्‍यादरम्‍यान रेहाम यांना हा एसएमएस मिळाला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...