आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस-या अॅशेस कसोटीचा थरार आजपासून रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहॅम - इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील तिस-या कसोटीला बुधवारपासून सुरुवात होत आहे. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली होती, तर पहिल्या कसोटीचा पराभव मागे टाकून ऑस्ट्रेलियाने लॉर्ड््स कसोटी जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी केली. दुस-या कसोटीतील पराभवानंतर आता यजमान इंग्लंड संघ बुधवारपासून सुरू होणा-या बर्मिंगहॅम सामन्यात विजय मिळवण्याच्या लक्ष्याने खेळणार आहे, तर ही कसोटी जिंकून आघाडी घेण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

दोन्ही संघ असे
>इंग्लंड : अॅलेस्टर कुक (कर्णधार), अॅडम लँथ, इयान बेल, जो. रुट, जॉनी बेयरस्टा, बेन स्ट्रोक्स, जोस बटलर, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड, जेम्स अँडरसन, आदिल रशीद.
>ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, क्रिस रोजर्स, स्टिव्हन स्मिथ, अॅडम वोग्स, मिशेल मार्श, पीटर नेविल, मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, जोस हेझलवूड, नॅथन लॉयन, पीटर सिडल.