आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच मॅचमध्ये या क्रिकेटरने घटवले 4.5 KG वजन, हे आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राउंडवर बसलेला पीटर... - Divya Marathi
ग्राउंडवर बसलेला पीटर...
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पीटर हँड्सकॉम्ब सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, त्याचे क्रिकेटमधील परफॉर्मन्स नाही, तर काही औरच आहे. बांग्लादेश विरुद्ध चटगाव टेस्ट सामन्यात बॅटिंग करणाऱ्या या क्रिकेटरचे वजन एकाच मॅचमध्ये 4.5 किलोंनी कमी झाले.
 

झाले असे...
- चटगांवचे वातावरण सध्या खूप गरम आहे. पीटर या उष्ण वातावरणाला सहन करू शकला नाही. त्यामुळेच, बॅटिंग करत असताना तो वारंवार ब्रेक घेत होता. उष्माघाताने तो एवढा दमला, की त्याचे वजन चक्क 4.5 किलोंनी कमी झाले आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पिचवर दोन तास घालवून पीटर हँड्सकॉम्ब उभे राहण्याच्या परिस्थितीत सुद्धा राहिला नव्हता.
- सिरीजच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मंगळवारी पीटर 69 धावांवर नाबाद होता. साडे चार किलो वजन कमी झाल्यानंतरही तो तिसऱ्या दिवशी मैदानावर खेळण्यासाठी उतरला. मात्र, जास्त धावा न काढता तो 82 धावांवर बाद झाला. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, सिरीजच्या पहिल्या टेस्टमध्ये बांग्लादेशने इतिहास घडवत ऑस्ट्रेलियास प्रथमच मात दिली होती. या मॅचमध्ये बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी पराभूत केले होते.
 

पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...