आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहली यापुढे कधीही पेप्सी किंवा फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही, दिले हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल) - Divya Marathi
(फाइल)
स्पोर्ट्स डेस्क - जगातील सर्वात फिट क्रिकेटर्सपैकी एक भारतीय कर्णधार विराट कोहलीने पेप्सी, कोल्ड्रिंक किंवा फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही. त्याने सध्या असलेल्या या प्रॉडक्ट्सच्या एंडॉर्समेंट सुद्धा काढून घेतल्या आहेत. आरोग्यासाठी हानिकारक कोल्ड्रिंक्स आणि वर्णद्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती यापुढे करणार नाही असे त्याने स्पष्ट केले आहे. आरोग्य आणि फिटनेससाठी आपल्या फॅन्सला प्रोत्साहित करत असताना कोल्ड्रिंक्सच्या जाहिराती केल्यास चुकीचा संदेश जाईल असे विराटला वाटते. 
 
 
2011 पासून विराट पेप्सीची जाहिरात करत होता. एप्रिलमध्ये त्याची मुदत संपुष्टात आली. त्यानंतर कंपनी आणि विराट तो करार रिन्यू करणार अशी शक्यता होती. मात्र, विराटने प्रॉडक्टचे एंडॉर्समेंट सोडत असल्याचे जाहीर केले आहे. जे मी स्वतः पित नाही, तो दुसऱ्यांना पिण्यास का सांगू असे विराटने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विराट आपल्या सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दल खूप जागृक झाला आहे. त्याचे फॅन्स त्याच्या फिटनेस आणि विचारांनी प्रेरित होतात याची त्याला जाणीव आहे. म्हणूनच त्याने आता जाहिरातींचे ब्रॅन्ड्स निवडण्यास सावध होण्याचे निर्णय घेतला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विराट यापुढे फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींमध्ये सुद्धा दिसणार नाही.
बातम्या आणखी आहेत...