आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयची आज महत्त्वाची वार्षिक सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारशी आणि बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमपत्रिकेतील विषय यामुळे भावी संघर्षाची ठिणगी बुधवारी मुंबईत पडण्याची शक्यता आहे. २०१६-१७ च्या वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी, ऑडिटर्सच्या नियुक्त्या, बोर्ड सेक्रेटरीची निवडणूक, कार्यकारी समिती, स्टँडिंग समिती आणि काही विशेष समित्यांच्या तसेच नव्या निवड समितीच्या नेमणुका हे प्रमुख विषय वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार घटनेत बदल करून मगच पुढील कामकाज केले पाहिजे, असे लोढा समितीने बजावले आहे. त्यामुळे नव्या नेमणुका व निर्णय रद्द करण्याचा अधिकार लोढा समितीला असल्यामुळे सभेनंतरच्या वादळाच्या प्रतीक्षेत भारतीय क्रिकेट आहे.

लोढा समितीने बीसीसीआयला वारंवार जाणीव करून दिली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै रोजीच्या आदेशानुसार लोढा समितीला आदेशाची अंमलबजावणी योग्य रीतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्याचे अधिकार दिले आहेत. दुसरीकडे बीसीसीआयदेखील लोढा समितीला न जुमानता आपला कार्यक्रम पुढे रेटून नेण्याच्या प्रयत्नात आहे. निवड समिती सदस्यांसाठी दिल्ली व मुंबईत मुलाखती घेण्यात आल्या. बीसीसीआयने त्यासाठीचे निकषही स्वत:च ठरवून त्याप्रमाणे उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. लोढा समितीने शिफारस केल्याप्रमाणे ३ सदस्यांची निवड समिती निवडणार की, सध्याच्या ५ विभागांच्या प्रतिनिधीनुसार पाच जणांची निवड समिती असेल तेदेखील बुधवारीच स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...