आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी विजयाची आज लूट! भारत-आफ्रिका चौथा वनडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीमचे संचालक रवी शास्त्री व कर्णधार महेंद्र सिंग धोनी डावपेचावर चर्चा करताना.
चेन्नई - मालिकेतील चौथा एकदिवसीय सामन्यात सोनेरी विजयाची लूट करण्यासाठी यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ सज्ज झाले आहेत. गुरुवारी चेन्नईच्या मैदानावर हे दोन्ही संघ समोरासमोर असतील. हा सामना जिंकून मालिकेत विजयी ‘सीमोल्लंघन’ करण्याच्या इराद्याने आफ्रिका टीम मैदानावर उतरणार आहे. दोन विजयांसह आफ्रिकेने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सामना जिंकून यजमान टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधता येईल. हा सामना भारतासाठी ‘करा वा मरा’ असा आहे.
या सामन्यात भारताची प्रतिष्ठा व मालिका दोन्हीही पणाला लागलेल्या आहेत. दोन सामन्यांतील पराभवाने भारतीय संघ पाच वनडेच्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी आफ्रिकेच्या एका विजयाने भारतावर मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली जाऊ शकते. त्यामुळे घरच्या मैदानावर आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी ‘धोनी ब्रिगेड’ पूर्ण तयारीनिशी या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

शिखर धवन आणि सुरेश रैनाच्या सुमार फॉर्ममुळे सध्या भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. याच पराभवामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोरील अडचणीतही आता वाढ झाली. उपकर्णधार कोहलीदेखील सुमार खेळी करत आहे.

रोहित-धोनीवर मदार
टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आणि कर्णधार हो दोनच खेळाडू फॉर्मात आहेत. रोहितने तीन सामन्यांत २१८ धावा काढल्या. तसेच धोनीने १७० धावांची नोंद केली आहे. फॉर्मात असल्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर जबाबदारी वाढली आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी या दोन्ही खेळाडूंवर मोठ्या खेळीसाठी प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे.