आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-झिम्बाब्वे वनडे मालिकेला अाजपासून हाेणार सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनी अाता युवा खेळाडूंसाेबत नव्या अाव्हानासाठी सज्ज झाला अाहे. युवा खेळाडूंना अाजपासून अग्निपरीक्षेला सामाेरे जावे लागणार अाहे.
शनिवारपासून भारत अाणि यजमान झिम्बाब्वे यांंच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांंच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे. या मालिकेतील सलामीचा सामना हरारेच्या मैदानावर अाज रंगणार अाहे. अनुभवी अाणि यशस्वी कर्णधार धाेनी नव्या युवा खेळाडूंसाेबत मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार अाहे. टीम इंडियाच्या विजयाची मदार ही युवा खेळाडूंवर असेल. यामध्ये जसप्रीत बुमराहसह अक्षर पटेलसारख्या युवा खेळाडूंवर नजर असेल.
दुसरीकडे क्रेमरच्या नेतृत्वाखाली यजमान झिम्बाब्वे टीम या मालिकेत नशीब अाजमावणार अाहे. यजमानांना अापल्या घरच्या मैदानावर अव्वल कामगिरीचा विश्वास अाहे. मात्र, त्यासाठी या टीमला माेठी मेहनत घ्यावी लागेल. कारण टीम इंडियाचे सर्वच युवा खेळाडू जबरदस्त फाॅर्मात अाहेत.

भारतीय संघाने अातापर्यंत सात वेळा झिम्बाब्वे टीमवर मात केली अाहे. अातापर्यंत भारत अाणि झिम्बाब्वे टीममध्ये २०१३, २०१५ मध्ये वनडे मालिकेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या दाेन्ही मालिका भारतीय संघाने एकतर्फी विजयासह अापल्या नावे केल्या हाेत्या. अाता दाैऱ्यात ही वनडे मालिका ३-० ने जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

यजुवेंद्र, मनदीपचे पदार्पण : भारतीय संघाकडून यजुवेंद्र चहल, फैज फझल, करुण नायर, जयंत यादव यांनी अद्याप करिअरमध्ये एकही अांतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला नाही. या सर्व युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी अाहे.

धाेनी सर्वात अनुभवी
झिम्बाब्वे दाैऱ्यावर अालेल्या भारतीय संघामध्ये कर्णधार महेंद्रसिंग धाेनी सर्वात अनुभवी खेळाडू अाहे. त्याने अातापर्यंत अापल्या अांतरराष्ट्रीय करिअरमध्ये २७५ वनडे, ६८ टी-२० सामने खेळले अाहेत. त्यामुळे त्याला अांतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव अाहे.

धाेनी ११ वर्षांनंतर अाफ्रिका देशात
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनी तब्बल ११ वर्षांनंतर अाफ्रिका देशात खेळणार अाहे. यापूर्वी, २००५ मध्ये धाेनीने शेवटचा झिम्बाब्वे दाैरा केला हाेता. या वेळी त्याने अांतरराष्ट्रीय करिअर हे अवघ्या सहा महिन्यांचे हाेते. साैरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली ताे या दाैऱ्यात सहभागी झाला हाेता.

संभाव्य संघ
>भारत : महेंद्रसिंग धाेनी (कर्णधार), के. राहुल, फैज फझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायडू, केदार जाधव, जयंत यादव, मनदीप सिंग, रिषी धवन, यजुवेंद्र चहल, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, अक्षर पटेल.
>झिम्बाव्वे : ग्रीम क्रेमर (कर्णधार), तेंदाई चतारा, चामू चिभाभा, एल्टन चिंगुम्बुरा, क्रेग इर्विन, मदाझिवा, मारुमा, हॅमिल्टन मस्कदजा, वेलिंग्टन, पीटर मूर, रिचर्ड, सिकंदर रझा, डाेनाल्ड, सेन विल्यम्स.
बातम्या आणखी आहेत...