आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० विश्वचषक; शुक्रवारी मुंबईत कार्यक्रमाची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतात येत्या मार्च-एप्रिल २०१६ मध्ये होणाऱ्या ‘आयसीसी वर्ल्ड ट्वेन्टी-२०’ या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची गटवारी, सामन्यांची ठिकाणे आणि अन्य माहिती येत्या ११ डिसेंबरला मुंबईत समारंभपूर्वक जाहीर करण्यात येणार आहे. आयसीसीच्या वतीने चेअरमन शशांक मनोहर, प्रमुख अधिकारी डेव्हिड रिचर्डसन या वेळी उपस्थित असतील. याप्रसंगी माजी कसोटीपटू व टेलिव्हिजन समालोचक संजय मांजरेकर हे भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली, सलामीवीर शिखर धवन आणि मुंबईचा नवोदित लिटल मास्टर आणि टीम इंडियायाचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे यांच्याशी क्रिकेटविषयक संवाद साधणार आहेत.