आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये दोन नवे संघ, बीसीसीआयच्या कार्यकारी समितीने बैठकीत घेतला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न्यायमूर्ती लोढा समितीने केलेल्या शिफारशी मान्य करून त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांना आयपीएल सट्टेबाजीसंदर्भात दोन वर्षे निलंबनाची शिक्षा बीसीसीआयच्या कार्यकारिणीने रविवारी मुंबईतील बैठकीत कायम केली. त्यानुसार आयपीएल ९ व १० साठी दोन नव्या संघांची निविदा मागवून निवड करण्यात येईल. दोन वर्षांचे निलंबन पूर्ण झाल्यानंतर चेन्नई, राजस्थान परतण्याची शक्यता आहे. मात्र, १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरची आयपीएल किती संघांची असेल व निलंबित करण्यात आलेल्या संघांचे भवितव्य काय असेल याबाबत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. येत्या ९ नोव्हेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या शशांक मनोहर यांनी पारदर्शी कारभाराची हमी देणारा शब्द पाळणारे अनेक निर्णय रविवारी घेतले.

बैठकीत घेतलेले निर्णय असे
>लोढा समितीच्या निर्णयानुसार, दोन वर्षांसाठी चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे निलंबन कायम असेल.
>बीसीसीआयच्या संकेतस्थळावर यापुढे २५ लाखांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार टाकण्यात येतील.
>क्रिकेटपटू व पंचांना मिळणारे मानधन यापुढे संकेतस्थळावर पाहता येईल.
>बीसीसीआयचे आर्थिक लाभार्थी क्रिकेटपटू व त्यांना विविध मार्गाने मिळणारे मानधनही पाहता येईल.
>बीसीसीआयच्या कारभाराला शिस्त लावण्याच्या मालिकेतील आर्थिक बाबींबाबतचे महत्त्वाचे निर्णयही सभेत घेतले गेले. कोशाध्यक्षांच्या गावोगावी आणि मर्जीनुसार कार्यरत असलेले कोशाध्यक्षांचे कार्यालय मुंबईतून लवकरात लवकर कार्यान्वित होणार.
>बीसीसीआयच्या ‘प्रोजेक्ट ट्रान्सफॉर्मेशन’साठी मे. डेलॉइट यांची नियुक्ती.
>श्रीनिवासन यांच्या राजवटीतील चेन्नईच्या पी. बी. विजयराघनव अँड कंपनीच्या जागी मे. गोखले आणि साठे कंपनीची बीसीसीआयचे अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून नियुक्तीला मान्यता.
>बीसीसीआयच्या संलग्न राज्य संघटनांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदत, मानधन व अन्य निधीच्या वापराबाबतच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी मे. प्राइस वॉटर हाऊस कपूर यांची नियुक्ती.
>दुहेरी लाभाच्या कलमांमध्ये सुधारणा करून त्या अमलात आणण्याबाबत निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेणार.
>नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे प्राधान्याने पुनरुज्जीवन करण्यात येणार.
>भारतीय संघाच्या वस्त्रप्रावरणांच्या निर्मितीचे हक्क ‘नाइके’कडे कायम.
>पेप्सीकडून आयपीएल स्पॉन्सरशिप काढून घेणार. व्हिओ मोबाइल्सला हक्क देणार.