आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा परभणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- येत्या१५ अाॅक्टाेबरपासून पश्चिम विभागीय अांतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेला परभणीत सुरुवात हाेणार अाहे. या अांतरविद्यापीठ स्पर्धेत पश्चिम विभागातील राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा अाणि महाराष्ट्रातील एकूण ६० विद्यापीठांचे संघ सहभागी हाेणार अाहेत. मुलांची ही स्पर्धा १५ ते १८ अाॅक्टाेबरदरम्यान, ज्ञानोपासक महाविद्यालयात रंगणार अाहे. या वेळी स्पर्धेत ८०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी हाेतील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश मोरे यांनी दिली.
विद्यापीठ क्रीडा मंडळ यांच्या मान्यतेने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या यजमानपदाखाली या स्पर्धा ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.
अव्वल संघाला सर्वोत्कृष्ट खेळाडूंना महाविद्यालयाच्या वतीने ट्राॅफी देण्यात येईल. स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.गणेशराव दुधगावकर, क्रीडा संचालक डॉ.मनोज रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती गठीत करण्यात येणार आहे. तयारीसाठी क्रीडा विभागप्रमुख डॉ.माधव शेजूळ, प्रा.नवनाथ भालेराव, डॉ.प्रभाकर पंडित हे पुढाकार घेत आहेत.
२५० मॅटचा वापर
जिल्हाक्रीडा संकुल समितीच्या नवीन बहुउद्देशीय इनडोअर हॉलमध्ये अद्ययावत अश्या एकूण २५० मॅटवर सामन्यांचा थरार रंगणार अाहे. दिवस-रात्र प्रकाशझोतात या स्पर्धा खेळविल्या जातील. पाच राज्यांतील ६० विद्यापीठांतील जवळपास ८०० खेळाडू, संघ व्यवस्थापक यानिमित्त परभणीत दाखल होणार आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंचा यात समावेश असेल. त्यामुळे परभणीतील नवीन होतकरू विद्यार्थी, खेळाडूंना त्यांचा खेळ पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे. पाच हजार प्रेक्षक हे सामने पाहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
१५
अाॅक्टाेबरपासून प्रारंभ
०५
राज्यांचा समावेश
६०
विद्यापीठ संघ
८००
खेळाडू
०४
दिवस रंगणार स्पर्धा
अागामी स्पर्धा