आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unknown Facts About Sachin Tendulkar And Vinod Kambli 664 Run World Record

'रेकॉर्डब्रेक 664': कांबळीला बसली 'श्रीमुखात' तर सचिन पळून गेला होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा व्हिडिओ) - Divya Marathi
(फोटो: सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा व्हिडिओ)
विक्रमवीर सचिन तेंडुलकर याचा 24 एप्रिलला वाढदिवस आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे सचिनच्‍या खास आठवणीबद्दल...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचा बालपणीचा मित्र विनोद कांबळीचे शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिरात झाले. 24 फेब्रुवारी, 1988 रोजी हॅरिस शील्ड इंटर स्कूल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सेंट जेव्हियर्स (फोर्ट) विरुद्ध शारदाश्रम विद्यामंदिरच्या सेमिफायनच्या लढतीत सचिन आणि कांबळीने 664 धावांची रेकॉर्डब्रेक भागिदारी केली होती. जवळपास सर्वच क्रिकेट रसिकांना हा किस्सा माहीत आहे. परंतु, ही रेकॉर्डब्रेक भागिदारी करताना सचिन आणि कांबळीने प्रशिक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. एवढेच नव्हे तर त्यांचे आदेश धाब्यावर ठेवले होते. त्यामुळे विनोद कांबळीला कानाखाली बसली होती तर सचिन चुपचाप पळून गेल्याविषयी फारच कमी लोकांना माहिती असेल.
22 फेब्रुवारीला सुरु झाली होती लढत, दुसर्‍या दिवशी बनवले रेकॉर्ड...
मुंबईतील आझाद मैदानावर लॉर्ड हॅरिस शील्ड टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये शारदाश्रम विद्यामंदिराचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उरतला होते. कर्णधार सचिन तेंडुलकर होता. शारदाश्रम विद्यामंदिराची सुरुवात खराब झाली. रूपक मलयेत आणि अतुल रानडे एकापाठोपाठ तंबूत परतले. तिसर्‍या क्रमांकावर विनोद कांबळी तर चौथ्या क्रमांकावर सचिन मैदानात उतरला. दोन विकेट गेल्याने संत जेव्हियर्स स्कूल फॉर्ममध्ये होती. नंतर मात्र, कांबळी आणि सचिनने जेव्हियर्सच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले.

मैदानात उतरण्यापूर्वी सचिन आणि कांबळीने खाल्ला होता वडापाव
मैदानावर उतरण्यापूर्वी सचिन आणि कांबळीने वडापाववर ताव मारला होता. लढतीदरम्यान दोघांनी बॉलर्सला सळो की पळो करून सोडले होते. दोघांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या दिवशी खेळ समाप्त झाले तेव्हा सचिने 192 तर कांबळीने 182 धावा ठोकल्या होत्या. दुसर्‍या दिवशी डाव घोषित करण्‍याची सूचना गुरु रमाकांत आचरेकर यांनी सचिनला दिली होती. सचिननेही तेव्हा होकार दिला होता. काही कामामुळे आचरेकर दुसर्‍या मैदानावर आले नाही. या संधीचा फायदा घेत कर्णधार सचिन आणि विनोद कांबळी मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरले.

सहाय्यक कोच लक्ष्मण चव्हाण यांच्या इशार्‍यांकडून केले दुर्लक्ष...
सचिन आणि कांबळी क्रिजवर फटकेबाजी करत असताना सहायक कोच लक्ष्मण चव्हाण बाउंड्रीवरून दोघांना डाव घोषित करण्‍याबाबत वारंवार सूचना केल्या. परंतु दोघे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. लक्ष्मण चव्हाण इशारा करायचे तेव्हा, सचिन आणि कांबळी त्यांच्याकडे पाहातच नव्हते. त्यामुळे लक्ष्मण चव्हाण यांनी मैदानाच्या चारही बाजुंनी जाऊन दोघांना इशारे केले. परंतु, सचिन आणि कांबळीने त्यांचे मुळीच ऐकले नाही. लंच टाइममध्ये लक्ष्मण चव्हाण यांनी सचिनची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच गुरु आचरेकरांना भेटण्यास सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सचिनने गुरू आचरेकरांना फोन करून काय सांगितले आणि कांबळीने का केली मनमानी...