आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्मुक्त तिरंगी, तर रायडूकडे कसोटी मालिकेचे नेतृत्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या १९ वर्षांखालील विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद ऑस्ट्रेलिया अ आणि ५ ऑगस्टपासून द. आफ्रिका अ संघाविरुद्ध सुरू होत असलेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाचे नेतृत्व करेल. उन्मुक्तशिवाय द. आफ्रिका अ संघाविरुद्ध होणाऱ्या दोन चारदिवसीय अनधिकृत कसोटीत अंबाती रायडू भारत अ संघाचे नेतृत्व करेल.

बीसीसीआयच्या सीनियर टीमच्या निवड समितीने शनिवारी भारत अ संघाच्या आगामी मालिकेसाठी संघांची घोषणा केली. ५ ते १४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या तिरंगी मालिकेतील सर्व सामने चेन्नईत होतील.

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ : उन्मुक्त चंद (कर्णधार), मयंक अग्रवाल, मनीष पांडे, करुण नायर, केदार जाधव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, संदीप शर्मा, रश कलारिया, मनदीपसिंग, गुरकिरतसिंग, ऋषी धवन.

कसोटी अ संघ : अंबाती रायडू (कर्णधार), करुण नायर, अभिनव मुकुंद, अंकुश बैंस, श्रेयस अय्यर, अपराजित, विजय शंकर, जयंत यादव, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, ए. मिथुन, शार्दूल ठाकूर, ईश्वर पांडे, शेल्डन जॅक्सन,जीवनज्योत.
बातम्या आणखी आहेत...