आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॉप इंडियन क्रिकेटरची ग्लॅमरस वाइफ, स्पोर्ट्स कंपनीची आहे मालकीन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनय कुमार इंडियन टीममधून बाहेर असला तरीही आयपीएल आणि देशांतर्गत सामने खेळत आहे. - Divya Marathi
विनय कुमार इंडियन टीममधून बाहेर असला तरीही आयपीएल आणि देशांतर्गत सामने खेळत आहे.
स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर विनय कुमार सध्या कर्नाटक प्रीमियर लीग (KPL) च्या हुबळी टायगर्स टीमकडून खेळत आहे. विनय कुमार राइट आर्म मीडियम पेस बॉलर असून त्याने टीम इंडियासाठी 41 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो यशस्वी ठरला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2013 मध्ये खेळला होता.
 

दिल्लीत थाटात झाला होता विवाह
- विनय कुमार देवनागरी कर्नाटकचा राहणारा आहे. त्याच्या पत्नीचे नाव रिचा सिंह असून 2013 मध्ये या दोघांचा दिल्लीत थाटात विवाह झाला होता. 
- रिचा आणि विनय यांची भेट दिल्लीतच झाली होती. मूळ वाराणसीची असलेली रिचा हिचे शिक्षण भगवानपूर येथील सनबीम शाळेतून झाले आहे. 
- या दोघांची भेट त्यांच्याच एका परिचीत मित्राने करून दिली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना 4 वर्षे डेट केले. यानंतर दिल्लीत विवाह केला. 
- विनय कुमार जेवढा सिम्पल आहे, त्याची पत्नी तेवढीच ग्लॅमरस आहे. नव-नवीन कपडे आणि आलीशान गाड्यांमध्ये फिरणे तिला पसंत आहे. 
- रिचा एक बिजनेसवुमन असून बेंगळुरू येथील इंटेग्रिटी स्पोर्ट्स कंपनीची ती संचालक आहे.
- तिने आपल्या ट्वीटर अकाउंटवर स्वतःला रायटर आणि फॅशन डिझायनर सुद्धा म्हटले आहे. 
 

विनय कुमारचे क्रिकेट करिअर
- विनय कुमारने टीम इंडियासाठी 1 टेस्ट, 31 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 विकेट्स (1 टेस्ट, 38 वनडे आणि 10 टी-20) घेतल्या आहेत. 
- विनयने आपला वनडे डेब्यू मे 2010 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध केला होता. तर, टी-20 डेब्यू सु्द्धा त्याचवेळी श्रीलंकेत केला होता. 
- फर्स्ट क्लास करिअरमध्ये विनय कुमारने 115 मॅच खेळत 418 विकेट्स घेतल्या. लिस्ट-ए करियरमध्ये 122 मॅच खेळत त्याने 204 विकेट्स पटकावल्या आहेत. 
- IPL (इंडियन प्रीमियर लीग) मध्ये विनय कुमारने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु, कोच्चि टस्कर्स केरला, कोलकाता नाइटरायडर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळले आहे.
- विनय कुमारचे IPL करिअर जबरदस्त ठरले. टूर्नामेंटच्या सर्व 10 सीजनमध्ये त्याने 103 सामने खेळत 103 विकेट्स घेतल्या आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याच्या पत्नी आणि पर्सनल लाइफचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...