आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय; राहुल द्रविडचा विक्रम काढला मोडीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीने (नाबाद १५६) अापला झंझावात कायम ठेवताना शनिवारी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्याच दिवशी विक्रमाला गवसणी घातली.  करिअरमधील २० वे कसाेटी शतक साजरे करणारा विराट काेहली हा सत्रात सर्वाधिक धावांचा डाेंगर रचणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या नावे अाता २६८१  धावांची नाेंद झाली अाहेे. यातून त्याने १८ वर्षांपूर्वीचा विक्रम ब्रेक केला. यादरम्यान त्याने अापल्या देशाचा माजी कर्णधार अाणि कसाेटीपटू राहुल द्रविडला मागे टाकले. द्रविडच्या नावे १९९९ च्या सत्रात २६२६ धावांची नाेंद अाहे.   


विराट काेहली अाणि मुरली विजयच्या द्विशतकी भागीदारीच्या बळावर भारताने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या निर्णायक कसाेटीच्या पहिल्या डावात दिवसअखेर ४ बाद ३७१ धावा काढल्या. श्रीलंकेकडून संदाकनने दाेन विकेट घेतल्या. अाता भारताचा काेहली अाणि राेहित शर्मा (नाबाद ६) हे मैदानावर खेळत अाहे. या दाेघांकडून पुन्हा एकदा माेठ्या भागीदारीची टीमला अाशा अाहे. त्यांनी गत नागपूर कसाेटीत माेठी भागीदारी रचली हाेती.  


भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, मुरली विजय अाणि धवनने भारताला चांगली सुरुवात करून दिली. 


वेगवान १६ हजार धावा 
काेहलीने ३५० डावांतून अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण केल्या. यासह ताे वेगवान धावा काढणारा पहिला फलदंाज ठरला. यामध्ये त्याने अाफ्रिकेच्या हाशिम अामलाला (३६३ डाव) मागे टाकले.

 

> विराट काेहलीची मालिकेत सलग तीन डावांत शतके  

> काेहलीचे २० वे कसाेटी शतक; सत्रात २६८१ धावा पूर्ण  

> द्रविडचा १९९९ च्या सत्रातील २६२६ धावांचा विक्रम मागे  

> सलामीवीर मुरली विजयने ठाेकले ११ वे कसाेटी शतक  

> विराट काेहली-मुरलीची २८३ धावांची माेठी भागीदारी  

 

तिन्ही फाॅरमॅट मिळून २६८१ धावा 
काेहलीने क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमधील लय कायम ठेवताना विक्रमी धावांचा पल्ला गाठला. यातून त्याने सत्रात कसाेटी, वनडे अाणि टी-२० सामन्यातून २६८१ धावा पूर्ण केल्या. यामुळे एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा काढणारा काेहली हा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी द्रविडने १९९९ मध्ये सत्रात २६२६ धावा काढल्या हाेत्या. एकाच सत्रात सर्वाधिक अांतरराष्ट्रीय धावा काढण्याचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावे (२००५ मध्ये २८३३) अाहे.   

 

गाठला पाच हजार धावांचा पल्ला 
तिसऱ्या कसाेटीत वैयक्तिक २५ धावा पूर्ण केल्यानंतर काेहलीच्या नावे नव्या विक्रमी कामगिरीची नाेंद झाली. यातून त्याने कसाेटीत पाच हजार धावांचा पल्ला गाठला. अशा प्रकारे कसाेटीत पाचहजारी झालेला काेहली हा भारताचा ११ वा अाणि जगातला ९४ वा फलंदाज ठरला. त्याने ६३ कसाेटीतील १०५ डावांतून हा पल्ला गाठला अाहे. 

 

१५ वर्षांनंतर सलग तीन डावांत शतके
भारतााचा काेहली हा तुफानी खेळी करताना मालिका गाजवत अाहे. त्याने अाता या मालिकेतील सलग तीन डावांत शतके साजरी केली.  असे त्याला १५ वर्षांनंतर भारताकडून करता अाली. २००२ मध्ये राहुल द्रविडने हा पराक्रम गाजवला हाेता. त्याने सलग चार डावांत शतके ठाेकली हाेती.  तीन कसाेटीच्या मालिकेत शतके ठाेकणारा काेहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला.

 

कोहलीचे 8 कारनामे

 

1. सर्वात वेगवान 16000 धावा करणारा क्रिकेटर

बॅट्समन इनिंग्स
विराट कोहली 350
हाशिम आमला 363
ब्रायन लारा 374
सचिन तेंडुलकर 374

 

2. 5000 धावा करणारा चौथा फास्टेस्ट इंडियन

बॅट्समन इनिंग्स
सुनील गावस्कर 95
विरेंद्र सेहवाग 98
सचिन तेंडुलकर 103
विराट कोहली 105

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, दिल्लीतील टेस्ट सामन्यात विराटच्या उर्वरीत 6 अचीव्हमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...