आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये विराटला विश्रांती, अनुष्काचीही सुट्टी, पुन्हा लग्नाच्या चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोघेही सुट्टीवर जात आहेत. - Divya Marathi
दोघेही सुट्टीवर जात आहेत.

स्पोर्ट्स डेस्क - चांगल्या फॉर्मात असतानाही इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. 10 डिसेंबरपासून होणाऱ्या श्रीलंकाविरुद्धच्या एक दिवसीय सिरीजमध्ये तो सहभाग घेणार नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 जणांच्या तिसऱ्या टेस्ट टीममध्ये देखील विराट नाही. त्याच्या जागी रोहित शर्मा टीमला लीड करणार आहे.

 

एवढेच नव्हे, तर अनुष्का शर्मा देखील सुट्टीवर जात आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डिसेंबरमध्ये अनुष्का शर्मा देखील कुठल्याही प्रकारचे शूट करण्यास इच्छुक नाही. त्यामुळे हे दोघे डिसेंबरमध्येच विवाह करणार अशा चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. 

 

उल्लेखनीय बाब म्हणजे, विराट कोहलीने श्रीलंकाविरुद्ध टेस्ट सुरू होण्यापूर्वीच आपल्या सुट्टीचा अर्ज दिला होता. त्यावर विचार करून बीसीसीआयने सोमवारी हा निर्णय जाहीर केला. सुट्टीचे कारण मात्र विराटने जाहीर केले नाही. एका पत्रकार परिषदेत मात्र आपण कित्येक वर्षांपासून खेळत आहोत असे विराटने म्हटले होते. यासोबतच, आपण माणुस आहोत रोबोट नाही, कापल्यास रक्तच निघेल असे म्हणत त्याने आपल्या सहकाऱ्याच्या विश्रांतीचे समर्थन केले होते. काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काच्या एका जाहिरातीचे शूट व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...