आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICC T20 rankings : कोहली अव्वलस्थानी; मॅक्सवेलची मोठी झेप !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत नंबर वनच्या खुर्चीवर कायम आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत एका शतकासह २११ धावा काढणारा ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने १६ स्थानांच्या प्रगतीसह तिसरे स्थान गाठले आहे. त्याने तब्बल १६ स्थानांची झेप घेतली. मॅक्सवेलची कारकीर्दीतील ही सर्वोत्तम रँकिंग आहे. यासह अष्टपैलूंच्या यादीत तो नंबर वन आहे. कोहली ८२० गुणांसह नंबर वन तर ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच ७७१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मॅक्सवेल ७६३ गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तिल चौथ्या, तर द. आफ्रिकेचा फॉप डुप्लेसिस पाचव्या स्थानी आहे.
बातम्या आणखी आहेत...