आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीकडे 2 कोटींची आणखी एक लक्झरी ऑडी कार, पाहा फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीने आपल्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका लक्झरी कारची भर घातली आहे. विराट कोहलीने ऑडी A8L ही 2 कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख जो किंग यांनी या कारची चावी विराटकडे हॅंडओव्हर केली. कोहलीकडे आधीपासूनच ऑडी कंपनीची R8, R8 LMX लिमिटेड अॅडिशन आणि Q7 कार आहेत. या कारची किंमत साधारणपणे 3 कोटी रुपये एवढी आहे. मात्र त्याने आणखी एक लक्झरी ऑडी कार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता विराटच्या पार्किंग लॉटमध्ये ऑडीच्या लक्झरी कार दिसून येतील.
अशी आहे कार
ऑडी ए-8 एलची बॉडी लाइट वेटबरोबरच स्टायलिश असून स्ट्रायकिंग डिझाइनशिवाय लाँग व्हीलबेस व्हर्जन आहे. ऑडीची A8 L मॉडेल 3.0 लीटर V6 डीझेल, 4.2 लीटर V8 डीझेल आणि 6.3 लीटर W12 पेट्रोल या तीन प्रकारात उपल्बद्ध आहे. यांची किंमत साधारणपणे 1.17 कोटीपासून ते 1.87 कोटी पर्यंत (एक्स शोरूम प्राइज, दिल्ली) आहे. कोहलीने घेतलेली ही कार या प्रकारातील सर्वात टॉप मॉडेल असलेली कार (6.3 लीटर W12 पेट्रोल) असून हीची किंमत साधारणपणे 2 कोटी आहे.
या कराला 6.3-litre चे पेट्रोल इंजन आहे. कारमध्ये 8 स्पीड गियरबॉक्स आहे. पावर 494 बीएचसपी आणि मैग्झिमम टॉर्क 625Nm आहे. तर बसण्यासाठी चार सीट आहेत. या कारमध्ये 5.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरचा वेग घेण्याची क्षमता आहे. विराटचीही कार ब्लॅक कलरची असून, तिच्यावर क्रिस्टल इफेक्ट दिसून येतो. नुकतीच बॉलीवुड अॅक्टर अभिषेक बच्चनने याच प्रकारची 4.2 लीटर V8 डीझेल कार विकत घेतली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाह, टेस्ट ड्राइव्ह करताना विराट कोहली आणि कारचे काही खास फोटो...