आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहलीसारखा प्रतिभावंत आज जगात कोणीही नाही; गेल, कपिल, इंझमाम या दिग्गजांचे विराटबाबत एकमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कसोटी क्रिकेटमध्ये या वर्षी तीन द्विशतके ठोकणारा भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीची वरिष्ठ क्रिकेटपटूंनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. वेस्ट इंडीजचा क्रिस गेल, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक आणि भारताच्या कपिलदेवने कोहलीची केवळ स्तुती केली नाही तर तो आजघडीला जगाचा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनकडून कोहलीवर झालेली टीका अयोग्य असल्याचे या तिघांनी म्हटले.

क्रिस गेल यूएसएल-डियाजियोच्या रस्ते सुरक्षा अभियानासाठी सध्या नवी दिल्लीत आला आहे. गेल आणि कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये एकत्र खेळतात. गेल म्हणाला, “कोहलीचे प्रदर्शन थक्क करणारे आहे. तो खूपच प्रतिभावंत असून भविष्यात अनेक विक्रम त्याच्या बॅटने होतील. आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळताना मला कोहलीला समजण्याची संधी मिळाली. तो किमान पुढचे पाच, सहा वर्षे विश्व क्रिकेटमध्ये टॉपवर असेल, हे मी ठामपणे क्रिकेटप्रेमींना सांगू इच्छितो.’

कोहलीत आहे धावांची भूक - इंझमाम : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि आताचा राष्ट्रीय निवड समितीचा प्रमुख इंझमाम-उल-हकने टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या तंत्रावर आक्षेपार्ह टीका करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनवर कडाडून टीका केली. भारत-इंग्लंडदरम्यान चौथ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत अँडरसन म्हणाला, ‘भारतीय खेळपट्ट्यांवर चेंडूला उसळी नसल्याने या मालिकेत कोहलीच्या तंत्रातील दोष पुढे आलेले नाहीत.’ यावर इंझमाम म्हणाला, अँडरसनने भारतीय कर्णधाराकडे बोट दाखवण्याआधी भारतात विकेट घेऊन दाखवल्या पाहिजेत. कोहलीच्या धावा आणि त्याच्या क्षमतेवर अँडरसनने बोट दाखवल्याने मला धक्काच बसला. मी अँडरसनला भारतात अधिक बळी घेताना पाहिलेले नाही. तुम्ही इंग्लंडमध्ये धावा काढू शकत असला तरच तुम्ही चांगले फलंदाज आहात, असे अँडरसनला म्हणायचे आहे काय? इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय उपखंडात अपयशी ठरतात. मग त्यांना तरी कसे परिपूर्ण फलंदाज म्हणायचे. अँडरसनची टीका चूकच आहे, असे इंझमामने म्हटले.
अँडरसनने चष्मा लावून बघावे : कपिल
माजी क्रिकेटपटू मदनलाल, निखिल चोप्रा आणि मुरली कार्तिकची उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमात कपिलदेवने म्हटले की, ‘कोहली कशी फलंदाजी करतोय, हे अँडरसनने चष्मा लावून बघितले पाहिजे. असे केल्यावरच त्याला कोहली कळेल. कोहली आज सर्वोत्तम फॉर्मात आहे. आजतरी कोहलीसारखा जगात कोणीच नाही.’
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...