आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: फ्री हिट बॉलवर कोहलीने लावला डेफेंसिव्ह शॉट, चर्चा सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बांगलादेश दौऱ्यातील तीन वनडे मॅच सिरीज 2-0 ने गमावल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या गंभीर वातावरणावर सवाल उठवले जात आहेत. विराट कोहलीच्या फलंदाजीवर संशय व्यक्त केल्या जात आहे. दुसऱ्या वनडे सामन्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात विराट कोहली फ्री हिट बॉलवर डेफेंसिव्ह शॉट खेळताना दिसून येतो. अशा स्वरुपाच्या बॉलवर फलंदाज नेमहीच आक्रामक शॉट खेळतात. कारण यात बाद होण्याची भीती नसते.
काय झाले होते
बांगलादेशाविरुद्ध भारताचा स्कोअर जेव्हा 3.5 ओव्हरमध्ये 21/1 होता तस्कीन अहमदने विराटला बॉल टाकताना फ्रंट फुट नो बॉल टाकला. एम्पायरने याला नो बॉल असल्याचे घोषित केले. त्यानंतरचा बॉल फ्री हिट असल्याचे सांगितले. तस्कीनने त्यानंतरचा बॉल स्टंपच्या बाहेर टाकला. यावेळी विराटने मोठा शॉट लावण्याऐवजी रक्षात्मक म्हणजेच डिफेंसिव्ह शॉट खेळला. त्याने बॉल केवळ पॉईंटला वळवला.
का सुरु झाली चर्चा
वनडे सामन्यात बॉलर जेव्हा ओव्हरस्टेपिंग करतो तेव्हा नियमांनुसार तो नो बॉल असल्याचे घोषित केले जाते. त्यानंतरचा बॉल फ्री हिट असतो. यावर फलंदाज केवळ रन आऊट होऊ शकतो. त्यामुळे फलंदाज अशा बॉलवर उत्तुंग शॉट मारतात. पण विराटने याच्या विपरित केले. अशा बॉलवर डिफेंसिव्ह शॉट मारुन चर्चेला तोंड फोडले आहे. या सामन्यात कोहलीने केवळ 23 धावा काढल्या. या सामन्यापूर्वी धोनीने विराटची मदत मागितली होती. विराटनेही मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
पुढील स्लाईडवर बघा, टेस्टमध्ये कर्णधार झाल्यापासून विराट कोहलीचा फॉर्म खराब झाला आहे... आकड्यांनिशी वाचा पुढील स्लाईडवर