आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट नव्हे, स्मिथ सर्वाधिक सॅलरी घेणारा क्रिकेटर! शास्त्री सर्वात महाग कोच...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेट जगतात कमाई करण्याच्या बाबतीत भारतीय क्रिकेटर्सचा हात कुणीच धरू शकत नाही असे समजले जाते. आयपीएल, जाहिराती आणि ब्रॅन्ड्सकडून होणारी कमाई पाहते ते खरे आहे. मात्र, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी विविध देशांच्या खेळाडूंनी काही रक्कम सॅलरी म्हणून दिली जाते. त्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतीय क्रिकेटर्सला पिछाडीवर टाकतात.
 

‘क्रिकइन्फो’ च्या एका रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ सर्वात जास्त सॅलरी घेणारा क्रिकेटर आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्याला दरवर्षी 14.7 लाख डॉलर अर्थात जवळपास 10 कोटी भारतीय रुपये दिले जातात. इंगलंडचा जो रूट ईसीबीकडून दरवर्षी 13.8 लाख डॉलर (8.98 कोटी रुपये) आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयकडून दरवर्षी 10 लाख डॉलर (6.51 कोटी रुपये) दिले जातात. प्रशिक्षकांबद्दल बोलावयाचे झाल्यास रवी शास्त्री सर्वात महाग कोच आहे. शास्त्रीला बीसीसीआयकडून दरवर्षी 7.61 कोटी रुपये दिले जातात. 
 

बांग्लादेश, झिम्बाब्वेपेक्षा अधिक पगार आयरिश क्रिकेटर्सचा
- पाकिस्तानने याचवर्षी चॅम्पियंस ट्रॉफी जिंकली आहे. टेस्टमध्ये नंबर वन टीम बनली तरीही पाकच्या क्रिकेटर्सला दिला जाणारा पगार आयरलंडच्या क्रिकेटर्सपेक्षा कमी आहे. 
- पाकिस्तानच्या टॉप क्रिकेटर्सला 48.20 लाख रुपये वार्षिक पगार दिला जातो. तर आयरलंडच्या टॉप खेळांना दरवर्षी 48.84 लाख रुपये दिले जातात. 
- पाकिस्तानच नाही, तर बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेटर्सचा पगार देखील आयरिश क्रिकेटर्सच्या तुलनेत कमी आहे. 
 

अधिक खेळाडूंशी करार केल्याने भारतीय क्रिकेटर्सची फी कमी
- भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटर्सची फी कमी असण्याला अतिरिक्त खेळाडूंशी होणारे करार एक प्रमुख कारण आहे. बीसीसीआयने गतवर्षीच्या सीजनमध्ये 32 आणि पाकिस्तानने 35 खेळाडूंशी करार केला होता. 
- भारत-पाकच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया 20 आणि इंगलंडच्या संघात 18 खेळाडूंशी करार केले जातात. त्यामुळे, या संघांना क्रिकेटर्सला जास्त फी देणे परवडणारे आहे.  
- यासोबतच झिम्बाब्वेने आपल्या 15 खेळाडूंशी करार केला. त्यामुळे, ते आपल्या क्रिकेटर्सला अधिक फी देऊ शकतात. 
- श्रीलंकेने टॉप टियरसाठी केवळ 17 क्रिकेटर्सशी करार केला. 
- बीसीसीआयने आपल्या कमाईचा 26% खेळाडूंना देते. त्याचा निम्मा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिला जातो. 
- पीसीबी इंटरनॅशनल मॅचसाठी प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना प्रत्येक मॅचसाठी 3000 डॉलर (1.95 लाख रुपये) वेगळे देतो. 
 

भारतासोबत न खेळू शकल्याने पाकचे नुकसान
- पाकिस्तानी क्रिकेटर्सची कमाई कमी होण्यामागे भारत-पाक सिरीज बंद होणे आहे. 
- पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ला सर्वाधिक कमाई ब्रॉडकास्टिंग राइट्सच्या माध्यमातून मिळते. यात भारत-पाक मॅचच्या ब्रॉडकास्ट राइट्ससाठी सर्वात मोठी रक्कम मोजली जाते.  
- अशात भारत-पाकिस्तानमध्ये सिरीज होत नसल्याने पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डला नुकसान होत आहे. त्याचा थेट परिणाम तेथील खेळाडूंच्या पगारांवर सुद्धा होत आहे. 
 
 
एका टेस्ट मॅचसाठी सर्वाधिक पैसा भारतीय क्रिकेटर्सला
- एका टेस्ट मॅचसाठी भारतीय खेळाडूंना 15.22 लाख रुपये आणि एका वनडेसाठी 6.09 लाख रुपये फी दिली जाते. 
- टी-20 मध्ये इंगलंड सर्वाधिक 3.44 लाख रुपये फी देतो. 
- टेस्ट मॅचमध्ये सर्वात कमी फी झिम्बाब्वेकडून दिली जाते. ते आपल्या खेळाडूंना एका मॅचटसाठी केवळ 1.30 लाख रुपये, वनडेसाठी 65 हजार आणि टी-20 साठी 32 हजार रुपये एवढी फी देतात. 
- पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या टेस्ट क्रिकेटर्सला प्रत्येक मॅचसाठी 3.74 लाख रुपये, वनडेसाठी 2.35 लाख रुपये आणि एका टी-20 मॅचसाठी 1.70 लाख रुपये देतो.
 
टेस्टमध्ये सर्वाधिक फी घेणारे 10 खेळाडू
क्रमवारी खेळाडू देश सॅलरी
1 स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलिया 9.57 कोटी
2 जो रूट इंगलंड 8.98 कोटी
3 विराट कोहली भारत 6.51 कोटी
4 फाफ डु प्लेसिस साउथ अफ्रीका 3.84 कोटी
5 एंजेलो मॅथ्यूज श्रीलंका 2.08 कोटी
6 सरफराज अहमद पाकिस्तान 1.95 कोटी
7 जेसन होल्डर वेस्टइंडीज 1.75 कोटी
8 केन विलियम्सन न्युझीलंड 1.62 कोटी
9 शाकिब अल हसन बांग्लादेश 91 लाख
10 ग्रीम क्रीमर झिम्बाब्वे 0.58 लाख
 
पुढील स्लाइड्वर पाहा, सर्वाधिक फी देणारे देश...
बातम्या आणखी आहेत...