आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या वाढदिवसाचे वाइल्ड सेलिब्रेशन, मित्रांनी केले असे हाल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - राजकोट येथे झालेला टी-20 सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवर याचा काहीच फरक पडला नाही. मॅच संपताच टीम इंडियाचे सदस्य हॉटेलात पोहोचले आणि विराटचा वाढदिवस साजरा केला. विराटसाठी खास पिचच्या आकाराचे केक तयार करण्यात आले होते. केक कापताच ते खाणे सोडून विराटच्या मित्रांनी त्याला रंगवणे सुरू केले. यावेळी हार्दिक हसत-हसत सर्वांना बदला घेण्याचे सांगत होता आणि मग सगळेच विराटवर तुटून पडले. विराटचा चेहरा, केस केक आणि क्रीमने रंगवून अगदी जेलप्रमाणे त्याचे केस देखील सेट केले. या वाइल्ड बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो क्रिकेटर्सने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या वाइल्ड बर्थडे पार्टीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...