आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virender Sehwag Retires From International Cricket

निवृत्ती वृत्तास वीरेंद्र सेहवागचा नकार; निर्णयाची आज शक्यता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीच्या वृत्तास नकार दिला. सोमवारी त्याच्या निवृत्तीच्या वृत्ताने एकच खळबळ उडून दिली होती. मात्र, त्याने याबाबत कोणत्याही प्रकारचा आपण अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. यासह त्याने निवृत्तीच्या चर्चेवर पडदा टाकला आहे.

दुबईमधून मायदेशी भारतामध्ये परतल्यानंतरच आपण यावरचा निर्णय घेणार असल्याचेही त्याने या वेळी स्पष्ट केले. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वीरेंद्र सेहवागच्या निवृत्तीच्या निर्णयाला फेटाळून लावले. मागील दोन वर्षांपासून वीरेंद्र सेहवाग हा भारतीय संघाबाहेर आहे.

पुढे वाचा.. आज निर्णयावर नजर