आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Virender Sehwag Vs Piers Morgan Again: Former India Opener Trolls British Journalist Soon After India Won Kabaddi World Cup

भारताने कबड्डी विश्वचषक: वीरेंद्र सेहवागने इंग्लिश पत्रकाराला पुन्हा डिवचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि इंग्लिश पत्रकार पियर्स मोर्गन यांच्यातील वैर जगजाहीर आहे. हे दोघे िट्वटरवर पुन्हा एकदा भिडले. रविवारी रात्री विश्वचषक कबड्डीच्या फायनलमध्ये भारताने इराणला ३८-२९ ने पराभूत करून आठव्यांदा विजेतेपद पटकावले. भारताचे हे सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद ठरले. भारताने कबड्डीचे विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने िट्वटरवर कबड्डी संघाचे अभिनंदन केले. यानंतर त्याने पुन्हा इंग्लिश पत्रकार पियर्स मोर्गनला टार्गेट केले.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर सेहवागने िट्वट केले की, ‘झुंज, समर्पणाची भावना ...हमको दे दे ठाकूर..अजय ठाकूर तू रॉकस्टार आहेस. हार कर भी जीतने वाले को टीम इंडिया कहते हैं. चॅम्पियन्स..!’ यानंतर सेहवागने आणखी एक िट्वट करताना ब्रिटिश पत्रकार मोर्गनला डिवचले. सेहवाग म्हणाला, ‘कबड्डीचा शोध भारताने लावला आणि भारत या खेळात आठव्यांदा चॅम्पियन बनला. मात्र, काही देश असेसुद्धा आहेत, ज्यांनी क्रिकेटचा शोध लावला अन् ते विश्वचषकापासून दूर आहेत. ते फक्त शब्दांच्या चुका शोधण्यात पुढे आहेत.’ त्याने हे िट्वट मोर्गनला टॅगसुद्धा केले. यावर ब्रिटिश पत्रकाराने उत्तर दिले. मोर्गनने िट्वट केले की,‘मित्रा, आम्ही टार्ड आणि कर्लिंगचासुद्धा शोध लावला. आम्ही यात विश्व चॅम्पियन आहोत हे मी कधीही अभिमानाने म्हणणार नाही.’ यानंतर मोर्गनने दुसरे िट्वट करताना म्हटले की, ‘कबड्डी हा खेळ नाही. फक्त काही वयस्क लोकांचे मनोरंजन आहे, जे चारही बाजूंनी धावतात आणि एकमेकांना पकडत असतात.’
िट्वटरवर वीरेंद्र सेहवाग खूप प्रसिद्ध आहे. त्याचे िट्वट आणि बोलण्याची शैली अनेकांना आकर्षित करते. त्याचे फॉलोअर्ससुद्धा मोठ्या संख्येने आहेत.

इंग्लंड पुन्हा वर्ल्डकपबाहेर...
विश्वचषक कबड्डीत काही िदवसांपूर्वी भारताने इंग्लंडला ६९-१८ ने पराभूत केले होते तेव्हासुद्धा सेहवाग-पियर्स मोर्गन िट्वटर समोरासमोर होते. त्या वेळी सेहवागने म्हटले होते की, ‘इंग्लंड पुन्हा एकदा वर्ल्डकपबाहेर..यंदा कबड्डीत.’
बातम्या आणखी आहेत...