आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे सहवागचा लहाणा भाऊ, या गोष्टीवरून व्हायचे भांडण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोद सहवाग आणि पत्नी मीनाक्षी... - Divya Marathi
विनोद सहवाग आणि पत्नी मीनाक्षी...
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सहवाग आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. सहवागच्या कुटुंबात दोन मोठ्या बहिणी आणि एक लहाणा भाऊ सुद्धा आहे. विरु आपला भाऊ विनोदपेक्षा 15 महिन्यांनी मोठा आहे. भाऊ असले तरीही अगदी बेस्ट फ्रेंडप्रमाणे ते राहतात. विनोदच्या पत्नीचे नाव मीनाक्षी आहे. या कपलला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

बिझनेसमन आहे विनोद...
- विनोद सहवाग हरियाणातील झज्जर येथे 'सहवाग इंटरनॅशनल स्कूल'ची जबाबदारी पार पाडतो. 
- या व्यतिरिक्त विनोद नवी दिल्ली येथील सहवाग क्रिकेट एकॅडमीचे काम देखील पाहतो. 
- विरेंद्र क्रिकेट खेळत होता, तेव्हा देखील विनोदने वेग-वेगळे बिझनेस सांभाळत होता. 
 

लहानपणी क्रिकेटमुळे व्हायचे भांडण...
- एका इंटरव्यूत विनोदने सांगितले होते, की लहानपणी त्यांचा एक ग्रुप होता. यात विरेंद्रसह दोन चुलत भाऊ जोगिंदर आणि कुणाल होते. 
- विरु मोठा असल्याने तो प्रत्येक गोष्टीत विनोदवर धाक जमवण्याचा प्रयत्न करत होता. विरु नेहमीच विनोदला प्रथम बॅटिंग द्यायचा आणि स्वतः बॉलिंग करत राहायचा...
- ही विरुची ट्रिक होती. तो लवकरात लवकर विनोदला आऊट करायचा आणि बॅटिंगवर येऊन विनोदला तासंतास छळायचा... 
- बॉलिंग करत-करत कंटाळून जेव्हा विनोद पळायचा प्रयत्न करायचा तेव्हा विरु आणि विनोदची भांडणे व्हायची...
- यानंतर दोघांमध्ये एक डील होत असे. त्यानुसार, विनोदने विरुला आऊट केल्यास विनोदचे अख्खे होमवर्क विरु करणार... ही डील सुद्धा विनोदलाच महागात पडायची. विरु कधीच लवकर आऊट होत नव्हता. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, विरु आणि विनोदचे कुटुंबीय...
बातम्या आणखी आहेत...