आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virendra Sehwag Take Retirement From International Cricket And IPL

वीरुचा अलविदा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलमधून निवृत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका भारतीय क्रिकेटच्या ‘दबंग’ वीरेंद्र सेहवागने मागील २४ तासापांसून सुरू असलेल्या निवृत्तीच्या तर्कवितर्कांवर मंगळवारी पडदा टाकला. त्याने आपल्या ३८ व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती ट‌्विटवरून जाहीर केली. त्यामुळे एका दशकापर्यंत गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या सेहवागची तळपणारी बॅट आता शांत राहणार आहे.
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून आपण पूर्णपणे निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच सोमवारी त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते. ‘नजफगडचा सुलतान’ नावाने प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागने आपल्या ११ वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये १७ हजार २५३ धावांचा पल्ला यशस्वीपणे गाठला. त्याने १०४ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करताना ८५८६ धावा काढल्या. त्याने २५१ वनडेत ८२७३ धावांची नोंद केली. त्याने कसोटीत दोन वेळा तिहेरी शतक झळकावण्याचा पराक्रमही गाजवला. त्याने पाक (३०९ धावा, २००४) व आफ्रिकेविरुद्ध (३१९ धावा, २००८) हे तिहेरी शतक केले.
पुढे वाचा.. वाढदिवसाच्या दिवशी निवृत्ती