आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपेक्षा चतुर निघाला शिष्य, वीरु राहिला मागे, टीम इंडियात केली एन्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा युवा क्रिकेटर संदीप शर्मा याची जिम्बाब्वे टूरसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. 22 वर्षांचा संदीप या दौऱ्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये पाऊल ठेवणार आहे. आयपीएल-8 मध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन केल्याने त्याला हा सन्मान देण्यात आला आहे. आयपीएल-8 मध्ये संदीप बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रिती झिंटाची टीम किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो.
सेहवागला मानतो गुरु
आयपीएलचे गेल्या वर्षीचा सिजन 2014 मध्ये संदीपने 11 सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या होत्या. याचे श्रेय त्याने सिनिअर खेळाडू वीरेंद्र सेहवागला दिले होते. यावेळी संदीप म्हणाला होता, की वीरेंद्र पाजी शानदार व्यक्ती आहे. त्यांनी मला चांगला खेळाडू होण्यासाठी मोठी मदत केली. सराव करताना ते मला अनेक वेळा रोखून चांगला बॉल टाकण्याचा सल्ला द्यायचे. त्यांच्यासोबत खेळून मी बरेच काही शिकलो आहे.
विशेष म्हणजे वीरेंद्र सेहवागही किंग्ज एलेव्हन पंजाब टीमचा खेळाडू आहे.
गुरु सेहवाग राहिला मागे
संदीपने आपल्या चांगल्या खेळाचे श्रेय वीरुला दिले आहे. सोबत तो त्याला गुरुही मानतो. पण सीनिअर आणि स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियात संदीपला उपयुक्त संधी मिळाली आहे. सेहवागसह अनेक सीनिअर खेळाडू आयपीएलमधील चांगल्या खेळाच्या बळावर टीम इंडियात पुनरागमन करण्याची वाट बघत होते. पण असे झाले नाही. आयपीएलच्या केवळ एका टीमकडून खेळूनही त्याला टीम इंडियात स्थान मिळाले आहे.
संदीप शर्माबाबत काही महत्त्वपूर्ण बाबी
- 18 मे 1993 रोजी पंजाबमध्ये जन्म. पंजाबकडून क्रिकेट खेळतो.
- उजव्या हाताचा मीडिअम पेस बॉलर
- अंडर 19 वर्ल्डकपमध्ये दोनदा भारताचे प्रतिनिधित्व केले. 2010 आणि 2012 मध्ये.
- 2013 मध्ये टीम किंग्ज इलेव्हनने त्याला आयपीएलसाठी विकत घेतले होते.
- आयपीएल डेब्यू मॅचमध्ये संदीपने सनरायजर्स हैदराबादच्या विरुद्ध 21 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या होत्या.
- फस्ट क्लास क्रिकेटमध्ये 27 सामन्यांमध्ये 111 विकेट्स घेतल्या.
- फस्ट क्लासमधील एका मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. एका खेळीत बेस्ट प्रदर्शन 7/25 राहिला.
- फस्ट क्लास क्रिकेटमध्ये हाफ सेंचुरी लावली आहे. बेस्ट स्कोर 51 राहिला.
- 43 टी-२० सामन्यांमध्ये 54 विकेट्स घेतल्या.
पुढील स्लाईडवर बघा, संदीप शर्मा याचे इंस्टाग्राम अकाऊंटवरुन घेतलेले काही फोटो...