आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियात हवी होती ही भूमिका, माजी कर्णधार सौरव गांगुलीचा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने खुलासा केला की, राष्ट्रीय कोच बनण्यासाठी मी उत्सुक होतो. अखेरीस प्रशासक झालो. तुम्ही तेच करावे, जे तुम्हाला आवडते. त्याच्या परिणामाची चिंता करायला नको, असेही गांगुलीने सांगितले.

 

तुम्ही कल्पना करू शकत नाहीत, तुम्हाला तुमचे आयुष्य कुठे घेऊन जाईल. मी 1999 मध्ये ऑस्ट्रेलियात गेलो होतो. तेव्हा मी उपकर्णधारही नव्हतो. सचिन तेंडुलकर कर्णधर होता, असेही गांगुलीने सांगितले.

 

सौरव गांगुलीने एका कार्यक्रमा सांगितले की, जेवह मी प्रशासकीय कामांमध्ये आलो. तेव्हा कोच बनण्यासाठी उत्सुक होतो. जगमोहन डालमियांनी मला सांगितले की, तुम्ळी सहा महिन्यांसाठी प्रयत्न करा. त्यानंतर डालमियांचे निधन झाले. तेव्हा आसपास कोणीही नसल्याने मी बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष झालो. लोकांना अध्यक्ष बनण्यासाठी वीस वर्षे लागतात. 

 

सौरव म्हणाला की, जेव्हा मी 2008 साली क्रिकेटमधून सन्यास घेण्याची घोषणा केली. तेव्हा सचिन लंचला आला होता. तेव्हा सचिन म्हणाला की, तु असा निर्णय का घेतला? तेव्हा मी म्हटले की, मला आता खेळण्याची इच्छा नाही. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - फोटोज्

बातम्या आणखी आहेत...