आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोला या क्रिकेटरने दिली होती सुपरबाइक, अशी सुरू झाली लव्ह स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या बाइकसोबत प्रज्ञान आणि पत्नी... - Divya Marathi
आपल्या बाइकसोबत प्रज्ञान आणि पत्नी...
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा स्पिनर प्रज्ञान ओझा याचा आज 31 वा वाढदिवस आहे. भुवनेश्वर येथे 5 सप्टेंबर 1986 रोजी जन्मलेल्या प्रज्ञान ओझाची लव्ह स्टोरी इंटरेस्टिंग आहे. प्रज्ञान आणि पत्नीमध्ये अशी केमिस्ट्री आहे, की एकदा पत्नीने ओझाला बाइकवर फिरण्याची इच्छा व्यक्त केली. काही वेळातच प्रज्ञान ओझा आपल्या बायकोसाठी चक्क हार्ले डेविडसन बाइक घेऊन हजर झाला.
 

पहिल्या नजरेतच प्रेम
- मल्टीप्लेक्समध्ये प्रज्ञान आणि कराबी यांची भेट झाली. तेव्हाच प्रज्ञान कराबी बोरलच्या प्रेमात पडला. 
- 16 मे 2010 रोजी दोघांचा विवाह झाला. हा विवाह ओडिशातील परमपरेनुसार पार पडला होता. यात महेंद्र सिंह धोनी, हरभजन सिंह यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर सहभागी झाले होते. 
- विशेष म्हणजे, बोरल आणि क्रिकेटचा दूर-दूरचा ही संबंध नव्हता. कराबीने मायक्रोबायोलॉजी विषयात पीएचडी केली आहे. तिने हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. 
 

ओडिशातून कारकिर्दीची सुरुवात
- ओझाच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ओडीशातील शाळेतून झाली. चंद्रशेखरपूर येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच ओझाने एका क्रिकेट शिबीरात सहभाग घेतला होता. तेथूनच तो क्रिकेटबद्दल गंभीर झाला.
- प्रज्ञानच्या लेफ्ट आर्म स्पिनला कलाटणी दिली ती कोच विजय पॉल यांनी. क्रिकेटर बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्याने भुवनेश्वर सोडून हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. हैदराबादेत विजय पॉल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रशिक्षण घेतले.
बातम्या आणखी आहेत...